कोपरगाव तालुका
आ.काळे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जवळपास सुरु झाले असून यावर्षी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊसाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊस दराची चिंता पडली होती.मात्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सर्वप्रथम शेतकरी हिताचा निर्णय घेवून ऊस दराच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर येवून नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कर्मवीर काळे कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आ.काळे यांनी चालू वर्षी गळीत हंगामाच्या ऊसाला सरसकट पहिला हप्ता अडीच हजार रुपये जाहीर करून मागील वर्षी गाळपाला आलेल्या ऊसाला देखील अतिरिक्त शंभर रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता.आ.काळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी हा सत्कार केला आहे.
मागील वर्षी प्रचंड प्रमाणात झालेला परतीच्या पावसाने नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला मोर्चा ऊस शेतीकडे वळविला असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातच जवळपास साडे पाच लाख टन ऊस यावर्षीच्या गळीतासाठी उपलब्ध असून कार्यक्षेत्राबाहेर देखील उसाचे प्रमाण जास्त आहे.यावर्षी आलेले कोरोनाचे जागतिक संकट व उपलब्ध असलेला भरमसाठ ऊस त्यामुळे किती दर मिळणार याकडे जिल्ह्यतील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आ.काळे यांनी चालू वर्षी गळीत हंगामाच्या ऊसाला सरसकट पहिला हफ्ता अडीच हजार रुपये जाहीर करून मागील वर्षी गाळपाला आलेल्या ऊसाला देखील अतिरिक्त शंभर रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता.आ.काळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे नगदी पिक झाले आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून शेतकऱ्यांनी माजी खा.काळे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत त्यांचा सत्कार केला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, कृष्णराव गाडे,अशोक बैरागी,नंदकिशोर औताडे,दिलीप गोरे,बाळू शेट्टी,राहुल आहेर,राजाराम निबाळकर,चैतन्य कुलकर्णी,सचिन गाडे,दत्तात्रय निकम आदि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.