जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ४१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०२ रुग्ण बाधित आले आहे.तर नगर येथें स्राव तपासणीसाठी पाठवले नाही.खाजगी प्रयोग शाळा येथील तपासणीत एकही ०१ असे एकूण ०३ बाधित रुग्ण आढळले असून उपचारानंतर ०३ जणांना सोडून देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५६ हजार ४११ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८५७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज तीन रुग्ण बाधित आढळले असून त्यात निवारा येथील ०२ पुरुष वय-२५,२०, आदी दोन रुग्ण बाधित आढळले आहे.तर ग्रामीण भागात आज एक रुग्ण येसगाव येथे एक पुरुष वय -३७ बाधित आढळला आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार १७४ इतकी झाली आहे.त्यात ३३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७० टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ४७३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४९ हजार ८९२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.४२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार १०४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९६.७८ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बाधित आकडेवारी कमी झाल्यामुळे नागरिकांत समाधान निर्माण झाले आहे. तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.