जाहिरात-9423439946
जलसंधारण

संवत्सरला परिसरातील गणेश बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ६० लाखाचा निधी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात फुटून प्रचंड नुकसान झालेल्या संवत्सर येथील गणेश बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंधारणमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा नियोजनमधून ६० लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला असून या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“गेल्या वर्षी ११ ऑगस्ट २०२२ रोजी बंधाऱ्याच्या माती भरावाला अचानक भगदाड पडून भरावाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.या बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परजणे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस,नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे शिफारस केली होती.अखेर या प्रयत्नांना यश आले आहे”

कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या लोकसंख्येचे गांव म्हणून संवत्सरची ओळख असून या गांवांतर्गत असलेल्या मनाई वस्ती,औद्योगिक वसाहत व इतर वाड्या,वस्त्यांसह आसपासच्या गावांना गणेश बंधाऱ्यातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो.उन्हाळयात इतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असताना संवत्सरला मात्र गणेश बंधाऱ्यातील पाण्यामुळे कधीच टंचाई आलेली नाही.स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रयत्नातून शेती महामंडळाच्या क्षेत्रावर या बंधाऱ्याचा विस्तार करण्यात आला होता.या साठवण क्षमताही मोठी असल्याने बाराही महिने पिण्यासाठी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो.मात्र गेल्या वर्षी ११ ऑगस्ट २०२२ रोजी बंधाऱ्याच्या माती भरावाला अचानक भगदाड पडून भरावाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.या बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परजणे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस,नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे शिफारस केली होती.अखेर या प्रयत्नांना यश आले असून निधी मंजूर झाल्याने दुरुस्तीच्या कामास तातडीने प्रारंभ करण्यात आला आहे.बंधारा दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ नुकताच राजेश परजणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता विनायक पंडोरे,पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जी.पी.गुंजाळ,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे,खंडू फेपाळे,लक्ष्मण परजणे,दिलीप ढेपले,सुभाष डरांगे,राजेंद्र बेलदार,अनिल आचारी,बबनराव भाकरे,अरविंद जगताप,जालिंदर रोहोम, बाळासाहेब दहे,शिवाजी गायकवाड,हबीबभाई तांबोळी,बापुसाहेब गायकवाड,नितीन भाकरे,शंकर भोसले,दिलीप तिरमखे,सोमनाथ घेर,ज्ञानेश्वर भाकरे,ग्रामविकास अधिकारी आहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री विखे यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close