निवड
नवीन डॉक्टर संघटनेची स्थापना,..यांची अध्यक्षपदी निवड

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी एकत्र येऊन “कोपरगांव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन ” ची पुनर्स्थापना केली असून या संघटनेच्या अध्यक्ष पदी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.राजेंद्र श्रीमाळी तर जनरल प्रॅक्टिशनर डॉ.राकेश भल्ला यांची सचिवपदी व डॉ.सुयोग भंडारी यांची खजिनदार पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.नूतन अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ.अमोल थोरात,सहसचिव पदी डॉ.आनंद काळे यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगांव तालुक्यात शंभर हुन अधिक होमिओपॅथिक डॉक्टर्स सामान्य जनतेची वैद्यकीय सेवा करत असून जनतेच्या आरोग्याचे ते आधार स्तंभ आहेत.तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन हि संघटना केली असून त्याद्वारे विविध तज्ज्ञांचे लेक्चर्स.सामाजिक व आरोग्याचे उपक्रम,ज्ञानसंवर्धन,योगा व खेळाचे आयोजन,सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम करण्याचा मानस अध्यक्ष डॉ.राजेंद्र श्रीमाळी व सचिव डॉ.राकेश भल्ला यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ.अमोल थोरात,सहसचिव पदी डॉ.आनंद काळे यांची निवड झाली असून कमिटीमध्ये डॉ.प्रफुल्ल कुडके,डॉ.निलेश काबरा,डॉ.वसीम शेख,डॉ.अनिता मगर,डॉ.धारणगावकर,डॉ.मयूरी मुंढे,डॉ.शीतलकुमार सोनावणे,डॉ.उमेश कोठारी,डॉ.अब्रार शेख,डॉ.तेजस्वी शिंदे,डॉ.प्रसाद होन,डॉ.नेहा बत्रा,डॉ.तेजल आगवन आदींची निवड आगामी २०२५ च्या नवीन वर्षासाठी करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.