जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्मार्ट फोन हि आधुनिक काळाची गरज-दिशा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक युगात स्मार्ट फोनची गरज अधिक तीव्रतेने जाणवली असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात हे साधन महत्वपूर्ण ठरत असल्याने आगामी काळात या उपक्रमाला गती देणाऱ्या संस्थांच्या मागे आ.आशुतोष काळे हे फाउंडेशनच्या माध्यमातून खंबीरपणे उभा राहतिल असे आश्वासन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात दिले आहे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे सुरु करण्यात आलेला टाळेबंदीचा काळ संपला असला तरी शाळा महाविद्यालय बंदच आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळा,महाविद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेत आहेत.मात्र अनेक हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक स्मार्ट फोन घेवू शकत नाहीत-चैताली काळे

कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आ.आशुतोष काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या “जगण्याची कला”या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या निधीतून कोपरगाव तालुक्यातील १०वीच्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,ठोळे उद्योगसमूहाचे कैलास ठोळे,स्मिता जोशी,ज्ञानेश्वर वाकचौरे,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा संगिता मालकर,वृंदा कोऱ्हाळकर,वर्षा आगरकर, सुनीता वाकचौरे,सुनीता ससाणे,छाया गिरमे,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”कोरोना विषाणूच्या संकटामुळे सुरु करण्यात आलेला टाळेबंदीचा काळ संपला असला तरी शाळा महाविद्यालय बंदच आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळा,महाविद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेत आहेत.मात्र अनेक हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक स्मार्ट फोन घेवू शकत नाहीत.अशा काही विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आ.काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या निधीतून स्मार्ट फोन देण्यात आले हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या स्मार्ट फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सध्या येत असलेली अडचण दूर होणार असली तरी स्मार्ट फोनचा उपयोग हा केवळ अभ्यासासाठी करावा.शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नियमितपण शाळेत हजर राहून चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे असा सल्ला शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close