जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात डिजिटल उत्सवास प्रारंभ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी साजरा साजरा करण्यात नवरात्र उत्सव यावर्षी मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून या डिजिटल नवरात्र उत्सवाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने सर्वच महिला भगिनींसाठी हा डिजिटल नवरात्र उत्सव साजरा होत आहे.सर्वसामान्य नागरिकांसह अनेक महिलांनी आजपर्यंत न अनुभवलेला डिजिटल नवरात्र उत्सवाचा हजारो महिला घरबसल्या ‘याची देही,याची डोळा’ सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनुभव घेत आहेत- सुधाभाभी ठोळे

कोरोना संक्रमनामुळे मार्च महिन्यापासून सर्व सण-उत्सव साजरे करण्यावर सर्वसामान्य नागरिकांना मर्यादा आल्या होत्या त्यामुळे अनेक सण साध्या पद्धतीने नागरिकांनी साजरे केले आहेत.मात्र एकेक पाऊल सावधपणे टाकत जून महिन्यापासून लॉकडाऊनची बंधने शिथिल करण्यात येवून अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सण-उत्सव साजरे करण्यावरील बंधने मात्र आजही कायम आहे.अशा परिस्थितीत नवरात्र उत्सव साजरा कसा साजरा होणार याची महिला भगिनींना चिंता होती.हि चिंता प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दूर करून यावर्षी डिजिटल नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून महिलांना एकत्रित न येता देखील दरवर्षी प्रमाणे या नवरात्र उत्सवात सहभागी होता येत असून सामाजिक संकेतस्थळावरून हजारो महिला या डिजिटल नवरात्र उत्सवाशी पहिल्याच दिवशी जोडल्या गेल्या आहेत.या डिजिटल नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या कोपरगाव तालुक्यातील सर्व देवींच्या मंदिराची माहिती,नवरात्रीच्या नऊ दिवसांचे धार्मिक महत्व,विविध दुर्गारुपांचे सादरीकरण,कुंकुमआर्चन,देवीचे पाठ,भजन आदी कार्यक्रमाचा लाभ घेता येत आहे.तसेच कोरोना योध्ये या विषयावर रांगोळी स्पर्धा,नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करतांना व्हिडीओ तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात देखील महिलाभगिनी घरबसल्या सहजपणे सहभागी होता येत असल्यामुळे महिला भगिनींमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पसरले आहे.मागील काही महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या महिला भगिनी व सर्वसामान्य नागरीक सायंकाळी सात ते आठ या डिजिटल नवरात्र महोत्सवाचा आनंद घेत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close