जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून गत सहा महिन्यात ०२ हजार ०६७ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३७ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून काल सकाळी ११.०० च्या सुमारास तहसील कार्यालानजीक केलेल्या कारवाईत सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या ४४ अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या ०८ झाली आहे त्यात कोपरगाव शहरात काल ०१ रुग्ण बाधित निघाला तर ग्रामीण भागातील ०७ जण असे ०८ नागरिक बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०६७ इतकी झाली आहे.त्यात ८७ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई तहसील कार्यालयानजीक चौकात करण्यात आली आहे.

या कारवाईत आरोपी मुसा मेहमूद शेख वय-३८,इनडोअर गेम हॉल,भगवान रंगनाथ कोळसे वय-३५.रा.उंबरगाव ता.श्रीरामपूर,चेतन प्रकाश बोरसे वय-२३,दत्त नगर नाशिक,वकील परिद शेख,वय -२२,गांधीनगर,शाहिद नूरखान पठाण,वय-२०,गांधीनगर,हैदर हमीद पठाण,वय-२५,संजयनगर,यासिन करीम बेग वय-३४,यासिन करीम बेग,वय-३४,कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ,विनायक बळीराम धस,वय-३५,दहिगाव बोलका,मोहित हिराचंद गंगवाल वय-४१,बँक रोड,नदीम इस्माईल मणियार वय-४४ रा.गजानननगर,माहिबी मुदस्सीर इंद्रिस वय-२७, रा.येवला,मधुकर कचरू शिंगाडे,वय-५२ रा.ब्राम्हणगाव,शेख बसिर रईस वय-२७,येवला,वैभव समीर दळवी वय-२१.रा.कोपरगाव बेट,तुषार राजेंद्र गायकवाड,वय-२७,रा.संवत्सर,वसीम मोहम्मद हरून वय-२६ रा.येवला,आदीं दहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गाडी चालवताना फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंदात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेले आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले आहे.आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकारी अंबादास रामनाथ वाघ पो.कॉ.यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७११/२०२० भा.द.वि.कलम १८८ (२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close