सामाजिक उपक्रम
के.जे.सोमैय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी रांगोळी स्पर्धेत प्रथम

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैजापूर शहरातील जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून नुकत्याच संपन्न झालेल्या वैजापूर तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेत कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील विद्यार्थिनी कु.ऋत्विका कैलास चिनके हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.ऋत्विका चिनके ही वैजापूर येथील रहिवासी असून ती के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.एस.सी.मायक्रोबायोलॉजी या विषयात शिक्षण घेत आहेत.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान बक्षीस वितरण सोहळ्यात तिला सन्मानचिन्ह,रोख रक्कम रुपये ५१ हजार देऊन गौरविण्यात आले आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बी.एस.यादव,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा.आकाश पवार,प्रा.योगेश चौधरी व संजय पाचोरे यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.कु.ऋत्विका चिनके ही वैजापूर येथील रहिवासी असून ती के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.एस.सी.मायक्रोबायोलॉजी या विषयात शिक्षण घेत आहेत.तिच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ऍड.संजीवदादा कुलकर्णी,सदस्य संदीप रोहमारे यांनी तिचे अभिनंदन केले.कु.ऋत्विकाने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.