जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या विद्यालयात वाचन-प्रेरणा दिन साजरा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १५ आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम नेहमी करीत असत-मकरंद कोऱ्हाळकर

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा,या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तद्वतच डॉ. कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन शिक्षकांनीही करावे,असेही यात अभिप्रेत आहे.
देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम नेहमी करीत असत.वैज्ञानिक असताना त्यांनी १९९६ मध्ये ‘इंडिया २०२०’ हे पुस्तक लिहिले.याच पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.नकारात्मकतेचे कारण नाही,तुन्ही सर्व काही करू शकता.कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे, हे पटवून देण्याचा डॉ. कलाम यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.म्हणून आज कोपरगाव शहरातील श्री.गो.विद्यालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या डीजीटल तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले.

विदयालयांचे जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी. यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करा असे सांगितले. मराठीचे गोरे एस.डी .यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांचा जीवनपट विदयार्थांना सांगितला.ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल वितरीत केल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन बी.बी.कुळधरण यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार जेष्ठ शिक्षक रवि पाटील यांनी मानले.
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी वाचन-प्रेरणा दिवसांच्या विदयार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक डी.व्ही. तुपसैंदर ए. बी.अमृतकर ए. जे.कोताडे,एन.के.बडजाते उपस्थित होते.तसेच इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी झुम मिटींग व्दारे आॕन लाईन उपस्थित होते.

Related Articles

Close