कोपरगाव तालुका
कोपरगावात १.४५ लाखांची चोरी,आरोपी जेरबंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात रात्रीच्या सुमारास सप्तर्षी मळ्यात असेलेले साई समृद्धी नावाचे मेडीकल दुकानाचे कुलूप तोडून परप्रांतीय आरोपी किसन लडकीया बारेला (वय-२०) रा.अडावद ता.यावल जि.जळगाव व राजेश चांदीया बारेला (वय-३०) रा.वजापूर ता,शेंधवा जिल्हा बडवानी व गुड्डा पूर्ण नाव माहित नाही.या तिघांनी दुकानांचे कुलूप तोडून त्यातील ०१ लाख ३५ हजार ६०० रुपयांची रोख रकमेची चोरी केल्याचा गुन्हा फिर्यादी संजय शंकर वाणी (वय-४७) रा.सप्तर्षी मळा यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान याच आरोपीनी आणखी श्रीराम मंदिर रोडवरील रहिवाशी व अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ प्रकाश एजन्सी असलेले ईलेक्टरीक दुकान फोडून त्यातील १० हजार रुपये किमतीचा टॅब असा एकूण ०१ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.
कोपरगाव शहरात बस स्थानकासमोर संजय शंकर वाणी यांचे वरील साई समृद्धी नावाचे मेडिकल दुकान असून त्यांनी काल सांयकाळी सात वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले असता रात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी किसन लडकीया बारेला (वय-२०) रा.अडावद ता.यावल जि. जळगाव व राजेश चांदीया बारेला (वय-३०) रा.वजापूर ता,शेंधवा जिल्हा बडवानी व गुड्डा पूर्ण नाव माहित नाही.या तीन आरोपीनी दुकानाजवळ कोणी नाही हि संधी साधत मोठा डल्ला मारला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात बस स्थानकासमोर संजय शंकर वाणी यांचे वरील साई समृद्धी नावाचे मेडिकल दुकान असून त्यांनी काल सांयकाळी सात वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले असता रात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी किसन लडकीया बारेला (वय-२०) रा.अडावद ता.यावल जि. जळगाव व राजेश चांदीया बारेला (वय-३०) रा.वजापूर ता,शेंधवा जिल्हा बडवानी व गुड्डा पूर्ण नाव माहित नाही.या तीन आरोपीनी दुकानाजवळ कोणी नाही हि संधी साधत दुकानांचे कुलूप तोडून त्यातील दोन हजार,पाचशे,शंभर,दोनशे,वीस,दहा रुपयांच्या नोटा असलेल्या एकूण रक्कम ०१ लाख ३५ हजार ६०० रुपये रोख घेऊन पोबारा केला आहे.
त्यानंतर त्यांनी राममंदिर रोडला रहिवाशी असलेल्या फिर्यादी हरेश मोहनदास कराचीवाला (वय-४९) यांचे अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या वायव्येस शंभर फुटावर असलेले प्रकाश एजन्सी नावाचे दुकानात घुसून काळ्या रंगाचा १० हजार रुपये किमतीचा टॅब घेऊन नजीकचे नागरिक जागे झाल्याने व त्यांनी आरडाओरडा केल्याने पोबारा केला आहे.त्यानंतर ते सुभाषनगर परिसरात पळून जात असताना नागरिकांना आढळून आल्याने त्याना पोलिसानी जेरबंद केले आहे.या प्रकरणी फिर्यादी संजय वाणी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.क्रं.७६७/२०२० भा.द.वि.कलम.४५७,३८० प्रमाणे तर दुसरा फिर्यादी हरेश कराचीवाला यांच्या फिर्यादीवरून गु.र.क्रं.७६६/२०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० अन्वये वरील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.