अर्थकारण
कोपरगावातील विस्थापीत पथ विक्रेत्यांचे पुनर्वसन केले जाईल-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात लवकरच विक्री प्रक्षेत्राची आखणी करणे कामी नगरपरिषदेच्या नगररचना विभागा कडून कार्यवाही केली जाईल आणि त्या ठिकाणी विस्थापीत पथ विक्रेत्यांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
लोकसभेच्या स्थायी समितीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणात काही सुधारणा केल्यानंतर विधेयकाला मंजुरी मिळाली होती.त्यानंतर प्रत्येक राज्याने आपल्या अखत्यारितील महापालिकांना त्यांचे धोरण आखण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असून कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन,तसेच रहदारीला होणाऱ्या अडथळा कमी करण्याच्या उद्देशाने विक्री ना-विक्री प्रक्षेत्र ठरविणे,नगर पथ विक्रेता ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वाटप,शुल्क व आकार,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून देणे आदी अनुषंगिक बाबीच्या नियोजना करिता सदर समितीची बैठक संपन्न झाली आहे.
त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असून कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन,तसेच रहदारीला होणाऱ्या अडथळा कमी करण्याच्या उद्देशाने विक्री ना-विक्री प्रक्षेत्र ठरविणे,नगर पथ विक्रेता ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वाटप,शुल्क व आकार,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून देणे आदी अनुषंगिक बाबीच्या नियोजना करिता सदर समितीची बैठक आज सकाळी पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती.कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
सदर बैठकीस नगर पथ विक्रेता समिती अध्यक्ष मुख्याधिकारी शांताराम गोसावी,सदस्य पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,डॉ.कृष्णा फुलसुंदर,सहाय्यक नगररचनाकार दीपक बडगुजर,नितेश मिरीकर,सेन्ट्रल बँकचे गोविंद भरोसे,विधिज्ञ विद्यासागर शिंदे,सत्येन मुंदडा,लायन्सचे राम थोरे, यांच्या सहा शहरातील पथ विक्रेते प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”यासाठी सर्वेक्षणामध्ये वंचित पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण देखिल लवकरात लवकर केले जाईल.सर्वेक्षण पूर्ण झाले नंतर पथ विक्रेता यादी प्रसिध्द करण्यात येईल.या यादीच्या आधारे पथ विक्रेता प्रतिनिधींची स्थायी नगर पथविक्रेता समिती मतदानाच्या माध्यमातून तयार करण्यात येईल.तसेच नोंदणीकृत पथ विक्रेतांना विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल असे शेवटी आश्वासित केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थित पथ विक्रेते प्रतिनिधी यांनी आपल्या अडीअडचणी मांडून विक्री प्रक्षेत्र ठरविणे कामी पर्याय सुचवले.त्याच प्रमाणे आम्हाला विक्री प्रक्षेत्र ठरून दिल्यास आम्ही तेथील स्वच्छता राखू, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूअसे आश्वासन दिले आहे.
बैठकीच्या आयोजन करणे कामी कोपरगाव नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट,रामनाथ जाधव, स्वच्छता व आरोग्य विभागचे सुनील आरण,राजेंद्र तुजारे, कवलजीत लोट,प्रवीण पोटे यांनी परिश्रम घेतले आहेत.
बैठकीचे प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामनाथ जाधव यांनी मानले आहे.