जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावात पहिली जनता ताळेबंदी २४ मार्चला जाहीर करण्यात आली होती.व त्यांनतर केंद्र शासनाने मोठी सलग दोन महिन्याची ताळेबंदी जाहीर केली होती.कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर या उपनगरात १० एप्रिल रोजी पहिला महिला रुग्ण सापडला होता त्या नंतर तालुका प्रशासनाचे धाबे दणाणले होते.त्यानंतर तालुका प्रशासनाने कडक कारवाईचा निर्णय घेतला होता.व मुखपट्ट्या बांधणे ही सक्तीची अट लादली होती.त्याला पोलिसांनी चांगली दाद देत कडक अंमलबजावणी केली गेल्याने कोरोना साथ नियंत्रणात आणणे सोयीचे झाले मात्र केंद्र शासनाने पहिली ताळेबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढून शहरात विना मुखपट्टीचेच हुंदडायला सुरुवात केली होती.परिणामी शहरात मधील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती.गत दोन महिन्यात तर हा उच्चांक १६८ प्रति दिन इतका वाढला होता.त्याच बरोबर शहरात घरोघरी कोरोना रुग्णांची शोध मोहीम कोपरगाव नगरपरिषदेने दोन वेळेस राबवली गेल्याने छुपे रुग्ण समोर आणण्यास मदत झाली तीच बाब तालुका आरोग्य विभागाने “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” अंतर्गत तालुक्यातील गावागावात प्रत्येक कुटुंबाकडून माहिती घरोघरी जाऊन घेतल्याने रुग्ण वाढीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.त्यामुळे व्यापार व उद्योग धंद्यावर जो प्रतिकूल परिणाम झाला होता.व परिणामस्वरूप हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला होता.त्यांना आता प्रशासनाच्या या ताळेबंदी मुळे हायसे वाटल्यास नवल नाही.अलीकडील काही दिवसात कमी झालेली रुग्णवाढ ही तालुका प्रशासनाला दिलासा देऊन गेली आहे.अर्थातच नागरिकांना मुखपट्टीचे महात्म्य समजले व त्यांनी त्याला प्रतिसाद दिला व कोपरगाव नगर पालीकेने जी जनजागृती केली त्याला दाद द्यावी लागणार आहे.तीच बाब तालुका आरोग्य विभागाच्या हिंमतीला व त्यांच्या प्रयत्नाला द्यावी लागणार आहे.पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी यांनीही रात्रंदिन जी मेहनत घेतली त्याला तोड नाही.त्यामुळेच आजचा दिवस पाहता आला.ही तरी लढाई संपलेली नाही.जेष्ठ नागरिक,दुर्धर व्याधी असलेले नागरिक यांना अजुनही सार्वजनिक ठिकाणी,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागणार आहे.ही साथ रुग्ण बरा झाल्या नंतरही नव्वद दिवस प्रसार होऊ शकतो हा जागतिक तज्ज्ञांनी दिलेला इशारा पुरेसा बोलका आहे.त्यामुळे या रुग्णांची विलगिकरण व्यवस्था अटळ समजून रुग्णांशी अन्य नातेवाईकांना व्यवहार करावे लागतील हा निर्णय कटू असला तरी तो पाळावा लागणार आहे.तरच या साथीचा प्रसार थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता सुटका झाली म्हणून बिगर मुखपट्यांचे उदळता येणार नाही.याचे तरुण पिढीला भान ठेवावे लागणार आहे.
रविवारची ताळेबंदी उठवली म्हणून दुकानदारांना आता आपले दावे मोकळे करून चालणार नाही.व्यापारी महासंघाला हे यश एकट्याला घेता येणार नाही.अनेकांनी संधी समजून आपले उखळ पांढरे करून घेतले त्याला निव्वळ व्यापारीच जबाबदार नाही तर काही मेडिकल,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली संधी साधलेली आहे हे माध्यमांच्या नजरेतून सुटलेले नाही.
कोपरगाव तालुक्यातील कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव व आलेले सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांची सोय व्हावी म्हणून व्यापारी महासंघाने नगर परिषद प्रशासनाशी आज सकाळी ११.४५ वाजता महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी रविवारचा जनता बंद करण्याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी चर्चा केली आहे.व अन्य वेळी दुकाने सुरू ठेवण्याचा कालखंड का सकाळी ०९ ते सायंकाळी ०७ पर्यंत पूर्वी प्रमाणेच राहणार आहे. शहरातील व्यापारी व तत्सम वर्गाला आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांना आडून पाहण्याच्या संधीसाधुपणाला आळा घालावा लागेल हे इथे नमूद करणे गरजेचे वाटते. येत्या रविवार पासून दुकाने दररोज सुरू ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे.याला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दुजोरा दिला आहे.याबाबत महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती मात्र त्यांनी ही बाब पालिका प्रशासनाशी संबंधित असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे व स्वतः बोलतो असे सूतोवाच केल्याचेही कोयटे यांनी सांगितले आहे. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जनता संचारबंदी का व्यापाऱ्यांचा निर्णय असल्याने तो मागे घेण्याचा निर्णयही त्यांच्यावरच अवलंबून असल्याचे म्हटल्याचेही कोयटे यांनी म्हटले आहे.
वास्तविक रविवारी बहुतांशी दुकाने बंदच राहात आली आहे.मात्र मागील व्यापाराची तूट भरून काढण्यासाठी रविवारी दुकाने सुरू होणे ही बाब नक्कीच आनंददायी आहे.पण जबाबदारीचे भान देणारी मानवी लागेल.आगामी काळात
दुकानांची वेळ रात्री ०९ वाजेपर्यंत करावी म्हणून जिल्हाधिकारी यांना व्यापारी महासंघाने निवेदन दिले असून त्या बाबत ही लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.