जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धामोरीत डॉ.आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण गाव बंद !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तुलनेने शांत असलेल्या सुमारे दहा हजार लोकसंख्येच्या गावात आज शांततेला गालबोट लागले असून आज सकाळी गावातील सार्वजनिक मुतारीवर आतील बाजूवरील भिंतीवर अज्ञात व्यक्तीने काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण केल्याने गावात असंतोष पसरला असून गावाने आज संपूर्ण गाव दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.गावातील परिस्थिती शांततेत पण तणावपूर्ण असून त्याला पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दुजोरा दिला आहे.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आमच्या प्रतिनिधीने या बाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.व आपण लवकरच याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलिसानी एका संधिग्ध आरोपीस अटक केली असून त्याच्यावर या पूर्वी असे दोन-तीन गुन्हे दाखल झाला असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,धामोरी गाव हे कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण पंचवीस की.मी.अंतरावर आहे.या गावात सर्वच समाजाचे लोक गुण्या गोविंदाने रहात असताना आज सकाळी गावाच्या वेशीलगत लागूनच बाहेरील बाजूने ग्रामपंचायतीच्या मालकीची सार्वजनिक मुतारी आहे.सदर मुतारीवर आतील बाजूने रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने भारताचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काळ्या कोळशासम रंगात आक्षेपार्ह टिपणी केलेले लिखाण आढळून आले आहे.हि बाब सकाळी काही ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी हि घटना गावातील जेष्ठ नेते व कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी यांचे लक्षात आणून दिली.या घटनेची वार्ता गावभर पसरण्यास वेळ लागला नाही.वर्तमानात राज्यात काही समाजाच्या आरक्षणाचा वाद ऐरणीवर असताना हि घटना घडल्याने त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्याने गावात वातावरण दूषित होऊ लागल्याने हि बाब कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या निदर्शनात काही नागरिकांनी तत्काळ आणून दिली. त्यांनी तातडीने आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.व सावधानता म्हणून गावात पोलीस बळ वाढवले आहे.दरम्यान गावातील काही ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याची मागणी केली त्याला आर.पी.आय.चे शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर,व काही दलित संघटनाचे पदाधिकारी व समजदार नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यास संमती देऊन दुजोरा दिला आहे.त्यामुळे धामोरी हे गाव दोन दिवस बंद ठेण्यात आले आहे.गावात बहुजन समाज तीस टक्के तर दलित समाज वीस टक्के तर आदिवासी समाज,मुस्लिम व बाराबलुतेदार समाज मोठ्या संख्येने आहे.सर्वांनी समजूतदार पणा दाखवला आहे हे विशेष !

दरम्यान या घटनेबाबत फिर्यादी अविनाश बाळासाहेब अहिरे (वय-३३) रा.धामोरी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा क्रं.४९६/२०२० भा.द.वि.कलम२९५(अ) प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.

दरम्यान या बाबत घटनेचे गांभीर्य ओळखून नव्याने दाखल झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आमच्या प्रतिनिधीने या बाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.व आपण लवकरच याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close