जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

समताचे संचालक झंवर यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे गत पंचवीस वर्षांपासून अध्यक्ष असलेले व व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संस्थापक संचालक व समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे निष्ठावान सहकारी मोहनलाल झंवर (वय-७५) यांचे कोरोनाने आज सकाळी ९.४५ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,पुतणे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एका अत्यंत धाडसी मित्र,दिलदार व्यक्ती,स्पष्टवक्ता लढवय्या नेता,उत्साही माणूस,दानधर्म करणारे जिगरबाज मित्रत्वाच्या वृत्तीचे मोहनकाका झंवर यांच्या अचानकपणे जाण्याने आज संपूर्ण झंवर कुटुंबीय,व्यापारी,समता परिवार,मित्रपरिवार यांचेवर जो आघात झालाय,तो केवळ शब्दातीत-सुधीर डागा,महासचिव व्यापारी महासंघ

स्व.मोहनलाल झंवर हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावासाठी परिचित होते.त्यांना काही दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना संगमनेर या ठिकाणी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.त्यांनी किराणा असोसिएशनची व समता सहकारी पतसंस्थेचे संघटन करताना व मोट बांधताना त्यांचा प्रदीर्घ अनुभव कमी आला होता.ते अखेरपर्यंत या संघटनेचे अध्यक्ष म्हणून व समताचे संचालक म्हणून कार्यरत होते.त्यांचा निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close