जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीवर हात साफ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील येवला नाका मनमाड रोड येथील ‘अपना बाजार’ समोर गोविंद लोकनर यांच्या वेल्डिंगच्या दुकानाशेजारी आपली सुमारे २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ सी.जी.६३५५) हि उभी करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने लांबवली असल्याचा गुन्हा फिर्यादी बाळू आगाजी आव्हाने (वय-४५) रा.चांदगव्हाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरातील दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“फिर्यादी आणि त्यांचा मुलगा गौरव आव्हाने हे दोघे गरजेनुसार आपली वरील किमतीची व मालकीची दुचाकी वापरत असतात.दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अंदाजे ०९.३० वाजेच्या सुमारास मुलाने आपले वरील क्रमांकाची लाल पट्टे असलेली दुचाकी कामावर जाण्यासाठी येवला नाका येथे घेऊन गेला होता त्यावेळी ती अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात चोरट्यांची दहशत कमी होण्याची चिन्हे काही कमी होताना दिसत नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असून अशीच चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी कोपरगाव तालुक्यातील टेंपो चालक बाळू आव्हाने रा.चांदगव्हाण ता.कोपरगाव यांनी कोपरगाव शहरात गुन्हा दाखल केला आहे.

त्यात त्याने म्हटले आहे की,”आपण वरील गावचे रहिवासी असून आपला छोटा हत्ती चालविण्याचा व्यवसाय आहे.तर मुलगा गौरव आव्हाने हा कोपरगावातील येवला नाका येथे गोविंद लोकनर यांच्या वेल्डिंगच्या दुकानात वेल्डिंगचे काम करतो.आपण व आपला मुलगा गौरव आव्हाने हे दोघे गरजेनुसार आपली वरील किमतीची व मालकीची दुचाकी वापरत असतात.

दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अंदाजे ०९.३० वाजेच्या सुमारास मुलाने आपले वरील क्रमांकाची लाल पट्टे असलेली दुचाकी कामावर जाण्यासाठी येवला नाका येथे घेऊन गेला होता.ती त्याने येवला नाका गोविंद लोकनर यांचे दुकान शेजारी असलेल्या येथील अपना बाजार समोर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या आडोशाला उभी करून ठेवली होती.सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास सुट्टी झाल्यावर आपण सदर ठिकाणीही गेलो असता ती तेथे आढळून आली नाही.आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्या वेळी आपल्याला खात्री झाली की अज्ञात चोरट्याने बनावट चावीने तिच्यावर हात साफ केला आहे.त्यावरून आपली कोणातरी अज्ञात भामट्याने सुमारे २० हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.त्याने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीचा गुन्ह्याची नोंद दाखल केली आहे.

दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी चोरीचा गुन्हा नोंद क्रं.४५७/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दिलीप तिकोणे हे करीत असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close