जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

करंजीत कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आधुनिक शिक्षणाचे भगीरथ डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३३ वी जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला-कारभारी आगवन,माजी उपाध्यक्ष कर्मवीर साखर कारखाना

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना करून आज तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था समजली जाते.अशा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे.सर्वसामान्य व तळागळातील कुटुंबातील मुलांना शिक्षित होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी नुकतीच कोपरगाव तालुक्यात करंजीत कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असल्याने हा सोहळा सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य कारभारी आगवण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.त्यांच्या समवेत स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ.सूनील देसाई,साडूं भाई पठाण,विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी,सर्वश्री उपशिक्षक चौधरी बी.बी.,चव्हाण एस.डी.,जगताप एल.पी.,सांगळे जी.डी.,वसावे व्ही.आर.,डांगे एस.एस.,सरोदे ए.व्ही.,डोखे जी.एस.व सौ.अनाप ए.एम. उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close