जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खाजगी डॉक्टरकडून बाह्यरुग्ण विभाग सुरु-सेना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातलेले असताना कोपरगाव शहरांतील खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र आपल्या दवाखान्याची कवाडे बंद करून घेतली होती.त्यासाठी शहर सेनेचे नवीन अध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी प्रयत्न केले असता या कोपरगाव डॉक्टर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांनी रविवारी बाह्य रुग्ण विभाग सुरु करत असल्याचे आश्वासन दिल्याने शहर शिवसेनेने आत्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोपरगावातील डॉक्टर्सच्या संघटनेलाआवाहन करून व प्रत्यक्ष उपचार नसेल देता येत तर किमान आपण फोन द्वारे औषधे सुचवावे.कोपरगाव शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.मयुर जोर्वेकर यांनी नुकतेच आश्वासन दिले असून कोपरगावातील डॉक्टरांशी संपर्क साधला व सर्व डॉक्टर्सनी रविवारी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे हि समाधानाची बाब आहे-कलविंदर दडियाल,अध्यक्ष शहर शिवसेना

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३७ हजार ५२९ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६१३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात तीन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.कोपरगाव तालुक्यात आज अखेर ०१ हजार ६६५ रुग्ण बाधित आढळले आहे.तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज अखेर दर दहा लाखाला आतापर्यंत २९ हजार ५४० नागरिकांचे स्राव तपासले आहे.कोरोनाची साथ अद्याप नियंत्रणात आल्याची कोणतीही चिन्हे नाही.अशा कठीण समयी सरकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आपले कर्तव्य चोख पणे बजावत असताना खाजगी दवाखान्यानी मात्र रुग्णांना आपली सेवा देण्याऐवजी आपल्या दवाखान्याची कवाडे बंद करून घेतल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली होती.या बाबत शहर शिवसेनेने लक्ष घातले व नूतन अध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी याबाबत खाजगी वैद्यक संघटना अर्थात कोपरगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांचेशी संपर्क साधून या कठीण समयी नागरिकांना आपल्या सेवेतून दिलासा देणे गरजेचेच असल्याचे पटवून दिल्याने त्यांनी या बाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.व या बाबत आपला निर्णय कळवला आहे.

कोपरगाव शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.मयुर जोर्वेकर यांनी आश्वासन दिले की,आपण या विषयावर कोपरगावातील डॉक्टरांशी संपर्क साधला व सर्व डॉक्टर्सनी रविवारी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली तसेच फोन द्वारे तातडीची रुग्णसेवा घेण्यासाठी त्यांनी कोपरगावातील डॉक्टरांची यादीही दिली आहे.

यावेळी एसटी कामगार सेना प्रमुख भरत मोरे,विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, विक्रांत झावरे,वाहतूकसेना तालुका प्रमुख इरफान शेख,गगन हाडा,शहर संघटक बाळासाहेब साळुंके,विशाल झावरे,विभागप्रमुख विकास शर्मा,वासिम शेख,समीर पठाण,अक्षय वाकचौरे,अक्षय नन्नवरे, आकाश कानडे,वाल्मिक चिने,रितेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close