जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव शहरातील मंजूर निधीचे कामे पूर्ण करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या विकासासाठी मंजूर असलेल्या निधीतील अनेक कामे अपूर्णावस्थेत असून हि कामे तातडीने पूर्ण करा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे नुकतीच केली आहे.

“कोपरगाव शहरातील विविध विकासकामांच्या अपूर्ण असल्याबाबत चर्चा करून हि कामे लवकरात पूर्ण करावी त्याचबरोबर कोपरगाव-धारणगाव रोड पूर्ण होवून एक वर्ष देखील झाले नसतांना या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातास आमंत्रण देत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवावा”-सुनील गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेवून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांच्या अपूर्ण असल्याबाबत चर्चा करून हि कामे लवकरात पूर्ण करावी अशी मागणी केली.त्याचबरोबर कोपरगाव-धारणगाव रोड पूर्ण होवून एक वर्ष देखील झाले नसतांना या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातास आमंत्रण देत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवावा.तसेच कोपरगाव शहरातील अनेक जुन्या पाईप लाईनला गळती लागली असून त्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे या पाईप लाईनची तातडीने दुरुस्ती करावी अशा अनेक मागण्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केल्या आहेत.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,युवती तालुकाध्यक्ष वैशाली आभाळे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,जिल्हा सचिव रेखा जगताप,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,माया खरे,फकीर कुरेशी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण,राजेंद्र आभाळे,मुकुंद इंगळे,दिनकर खरे,प्रकाश दुशिंग,हारून शेख,शैलेश साबळे,अशोक आव्हाटे मनोज नरोडे,संदीप सावतडकर,वाल्मीक लाहिरे,जनार्दन शिंदे,हर्षल जयस्वाल,ऋषिकेश खैरनार,आकाश डागा आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close