कोपरगाव तालुका
कांद्याला भाव द्या अन्यथा आंदोलन- वाघ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात कोपरगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी बांधवांची अतिवृष्टी मूळे दुरावस्था झालेली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निर्यात बंद केली आहे.तरी सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होत असून केंद्र सरकारने या निर्णयाचा फेर विचार करून कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष सनी वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर सुलतानी निर्णय लादला आहे.आधी शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीत सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी घोषणा करावयाची व दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस बंधने आणावयाची अशी दुहेरी नीती केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादत आहे.त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही शेजारी व व्यापारी यांचे नुकसान होत आहे-सनी वाघ
केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर सुलतानी निर्णय लादला आहे.आधी शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीत सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी घोषणा करावयाची व दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस बंधने आणावयाची अशी दुहेरी नीती केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादत आहे.त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही शेजारी व व्यापारी यांचे नुकसान होत आहे.कोपरगाव शहर शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन देऊन या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले आहे. शेतकरी बंधूंच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहोचवत असून सदर निर्णय केंद्र सरकारने मागे घेऊन पुनर्विचार करावा अशा मागणीचे निवेदन कोपरगाव शहर शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार योगेश चन्द्रे यांना दिले आहे.तसेच लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन कोपरगाव तहसील कार्यालयासमोर येथे करून शेतकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देऊ असा इशारा शेवटी देण्यात आला आहे.
यावेळी गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष रविंद्र कथले,शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोरडे,संतोष जाधव,कुणाल लोणारी,सागर जाधव,अमोल शेलार,अनिल आव्हाड,शिवसेना संघटक वसिम चोपदार,अमित बांगर,सागर फडे,सनीं काळे,युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव,युवासेना शहरप्रमुख नितिष बोरुडे,सिद्धार्थ शेळके,युवासेना उपशहरप्रमुख,ऋषिकेश धुमाळ,शिवम नागरे,मयुर फुकटे,प्रीतेष जाधव,युवासेना उपतालुका प्रमुख विजय भोकरे,प्रशांत बोरावके,अक्षय गुंजाळ,विजय गोरडे,गणेश घुगे,अभिषेक सारंगधर,विशाल औटी आदी मान्यवर पदाधिकारी सुरक्षित अंतर पाळून उपस्थित होते.