कोपरगाव तालुका
..या गावात कहार समाज संघटना स्थापन

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे ग्लोबल कहार समाज चँरीटेबल ट्रस्टने स्थानिक कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे त्यावेळी सुरक्षित अंतराचे पालन करून मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.नवोदित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बुंदेलखंडातून हा कहार समाज देशभर विखुरला गेला आणि पुढे नदी तलावाच्या काठी या कहार समाजाने निवास केला आणि मासेमारी हे काम कहार समाजाचा मुख्य व्यवसाय झाला.नदीकाठी राहील्याने वाडी लावणे म्हणजे टरबूज खरबूज काकड्या खिरे अशी वाळुपात्रातील वेलीफळ त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आज हा समाज मुख्यकरुन मासेमारी वाड्या लावणे, आणि बाजारहाट करतांना आजही दिसतो. समाजातील काही लोक उच्चशिक्षित असले तरी अजूनही अधिकाधिक समाज हा मासेमारीवर अवलंबून आहे.
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील सर्व कहार समाज बांधवांनी एकत्र येऊन ग्लोबल कहार समाज चँरीटेबल ट्रस्टचे सामाजिक कार्य प्रेरणादायी मानून कान्हेगाव येथील गाव समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली आहे.येथील जेष्ठ नागरिक नारायण सुरभैय्या यांच्या अध्यक्षतेखाली तर ग्लोबल कहार समाज चँरीटेबल ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक लकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत
गाव समितीची स्थापना केली आहे.येथील गाव कमेटी कार्यकारणी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे.
या कार्यकारणीत अध्यक्ष संजय सुरभैय्या,उपाध्यक्ष अनिल सुरभैय्या,सचिव मनोहर सुरभैय्या,संघटक मनोज उचाडे,उपसचिव रामकृष्ण सुरभैय्या,खजिनदार रोहिदास सुरभैय्या,कार्याध्यक्ष अंबादास सुरभैय्या,वरीष्ठ सल्लागार,नारायण सुरभैय्या,जालींदर सुरभैय्या,संदिप गंगुले,गणेश सुरभैय्या,रविंद्र लहिरे, विठ्ठल लकारे,नंदकिशोर डहारे विठ्ठलराव लकारे,कोपरगाव तालुका संघटक गणेश इर्षे,राजेंद्र गंगुले,आदी उपस्थित होते