कोपरगाव तालुका
अपघातात माजी सरपंचाचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायतिचे माजी सरपंच बाळासाहेब विठ्ठल कसबे (वय-६३) यांचे नगर-मनमाड मार्गावर सावळीविहिर खुर्द शिवारात नुकत्याच झालेल्या अपघातात निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.बाळासाहेब कसबे हे सन-१९९७ ते २००० या कालखंडात सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच होते त्यांनी १९८३ साली दलित पँथरची स्थापना केली होती.आपल्या काळात अनेक समाजोपयोगी योजना ग्रामस्थांसाठी राबवल्या होत्या.ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रचलित होते.
स्व.बाळासाहेब कसबे हे सन-१९९७ ते २००० या कालखंडात सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच होते त्यांनी १९८३ साली दलित पँथरची स्थापना केली होती.आपल्या काळात अनेक समाजोपयोगी योजना ग्रामस्थांसाठी राबवल्या होत्या.ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रचलित होते.ते कोपरगाव येथे आपल्या शेड साठी पत्रे घेण्यासाठी आले होते पत्रे खरेदी झाल्या नंतर ते आपल्या घरी परतत होते.त्यावेळी मागुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याना धडक दिली त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे निधन झाले आहे.घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला होता.