जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नसर्गिक आपत्तीत सरकार शेतकऱ्यांबरोबर-आ.काळे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूज सेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील काही दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून काढणीला आलेली पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असला तरी महाविकास आघाडी सरकार नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच एका अकार्यक्रमात बोलताना दिली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला दोन ते तीन दिवस झालेल्या वादळी पावसाने झोडपून काढल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची तातडीने दखल घेवून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या अशी मागणी आपण मदत पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार व राज्यमंत्री ना.प्रसाद तनपुरे यांच्या कडे केली आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे करण्यात आलेल्या पंचनाम्याचे आढावा घेण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालय व राहाता तहसील कार्यालय येथे कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, सभापती पौर्णीमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,उपसभापती अर्जुन काळे कोपरगाव जिनिंग व प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,संचालक सचिन आव्हाड,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीप शिंदे,गणेश घाटे, विठ्ठल जावळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,कृषी अधिकारी श्री. शिंदे,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,वाकडीचे सरपंच डॉ. संपत शेळके,दत्तात्रय कोते,विष्णू वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ,ज्ञानदेव धनवटे,राष्ट्रवादी पदवीधर युवक तालुकाध्यक्ष सचिन धोर्डे,संजय धनवटे,आण्णासाहेब कोते,अशोक काळे,अरुण बोंबले,दिलीप चौधरी,शिवाजी साबदे,राजेंद्र धनवटे,खंडेराव वहाडणे,बाबासाहेब नळे,पद्मकांत सुराळकर,पोपट बरवंत,बाबासाहेब वाघ,महेश जाधव,ज्ञानेश्वर वर्पे,नितीन वाकचौरे,सुनील कुरकुटे,रंजित बोठे,११ गावांतील सर्व मंडलाधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

या बैठकीत मतदार संघात वादळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा व केलेल्या पंचनाम्याची त्यांनी तहसीलदारांकडून माहिती घेतली.तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या थकीत अनुदानाबाबतचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित उपस्थित राहावे.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कृषी विभागाने वेळेत सोडवाव्या. तसेच हलगर्जीपणा आढळून आल्यास गय केली जाणार नाही असा ईशारा आ.काळे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close