जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गल्लीत कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्याची गरज-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूपासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर आपल्याला बाहेरून येणाऱ्या आपल्याच माणसापासून बचाव करण्यासाठी गल्लोगल्लीत कोरोना नियंत्रण समित्या स्थापन कराव्या लागतील असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये केले आहे.

बाहेरून आपल्या शहरात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक विलागीकरणात ठेवल्यास संपूर्ण समाज कोरोनाच्या धोक्यापासून वाचू शकतो. दुर्दैवाने आजही आपल्या गावात अनेक शहरातून अनेकजण येताहेत. शासनाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता परस्पर कुटुंबात जाऊन रहातात.त्यांच्यापासून सर्वच परिवाराला, प्रभागाला कोरोना संसर्ग होऊ शकतो.

कोरोना विषाणूचा संसर्ग किंवा प्रादुर्भावामुळे होणारा कोविड-१९ हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्याने आतापर्यंत शासनाने अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत.मात्र कोरोना बधितांचा आकडा विलक्षण रीतीने वाढत आहे.आता तो अडीच लाखांच्यावर वर गेला आहे.व तो थांबण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत.अनेकदा टाळेबंदी सारखे कठोर उपायही करून बघितले. तरीही कोरोना संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही.आता टाळेबंदी नसल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणांत वाढला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई किंवा इतर शहरातून येणारे काही नागरिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आढळले व त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पीडितांची संख्या वाढलेली दिसते.

बाहेरून आपल्या शहरात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक विलागीकरणात ठेवल्यास संपूर्ण समाज कोरोनाच्या धोक्यापासून वाचू शकतो. दुर्दैवाने आजही आपल्या गावात अनेक शहरातून अनेकजण येताहेत. शासनाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता परस्पर कुटुंबात जाऊन रहातात.त्यांच्यापासून सर्वच परिवाराला, प्रभागाला कोरोना संसर्ग होऊ शकतो. असे झाल्यास संपूर्ण परिसर प्रतिबंधित करावा लागून १४ दिवस कुणालाही घराबाहेर पडता येत नाही.व्यवहार,व्यापार,व्यवसाय ठप्प होतात.असे होऊ नये म्हणून आवश्यकता असल्यास,शक्य असल्यास, त्यात कुठलेही राजकारण होणार नसल्यास तेथील नगरसेवक व प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन प्रत्येक गल्लीत किंवा प्रभागात एक “कोरोना नियंत्रण समिती ” स्थापन केली तर बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची व त्या कुटुंबांची नोंद करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल तसे करून आपण शासनालाही कळवून सहकार्य करू शकतो. आपल्या गल्लीत, परिसरात,कॉलनीत बाहेरून येणाऱ्यांची नोंद घेऊन, शासनाला कळवून आपला व आपल्या शहराचा कोरोनापासून बचाव करणे शक्य आहे असेही अध्यक्ष वाहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close