कोपरगाव तालुका
कोपरगावात सोन्याचे दागिने पळवले,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय ते धुळे-नंदुरबार सहकारी बँक खंदकनाला या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपण तुमचे नातेवाईक आहोत असा बहाणा करून लक्ष्मीनगर येथील फिर्यादी महिला बिस्मिल्ला महंमद रशीद मन्सूरी (वय-७०) यांच्या गळ्यातील दागिने काढण्यास भाग पाडून ते पळवून नेल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक पदावर राकेश मानगावकर आल्या पासून त्यांनी आपली कडक गस्त शहरात लावल्याने या घटनांना बऱ्यापैकी आळा बसला असताना हि दुर्दैवी घटना अनेक महिन्यांनी घडली असल्याने हे त्यांना अज्ञात चोरट्याने आव्हानच दिल्याचे मानले जात आहे.त्यांचा या पूर्वी चोरट्यानी चांगलाच धसका घेतला असताना हि धक्कादायक घटना घडली आहे हे विशेष !
सदरचे सविस्तर वृत्त से की,फिर्यादी महिला या लक्ष्मीनगर येथील रहिवाशी असून त्या आपल्या कुटूंबकबिल्यासह तेथे राहतात त्यांना, “कोविड-१९ या साथीची सरकारने भरपाई पाठवली आहे.ती तुम्हाला मी मिळवून देतो” अशी बतावणी करून त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करून त्याना आपल्या पतीला बोलविण्यास भाग पाडले व त्यांना धुळे-नंदुरबार सहकारी बँकेच्या बाजूस नेऊन कोणी नाही हे हेरून त्यांच्या पतीस झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने अन्यत्र पाठवले व त्या महिलेला,”तुमचे फोटो काढावयाचे आहे” अशी बतावणी करून त्यांच्या कडील ५० हजार रुपये किमतीची गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत,कानातील कर्ण फुले,नाकातील फुल,असे वरील वर्णनाचे दागिने पळवून नेले असल्याची घटना अनेक महिन्यांनी कोपरगाव शहरात प्रथमच घडली आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या घटनेची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.६६६/२०२० भा.द.वि.कलम ४१९,४२०,३७९ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.