कोपरगाव तालुका
फायटरचा वापर करून मारहाण,दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी कृष्णा पवार व त्यांचे गांधीनगर येथील सहकारी हे आपल्या खाजगी कंपणीच्या वसुलीच्या कामासाठी जात असताना ते धारणगाव रोड वरील पेट्रोल पंपावर पावणे अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकण्यास गेले असताना तेथील पेट्रोल पंपाच्या समोर दुचाकीवरून आलेले आरोपी ऋषिकेश गायकवाड व अविनाश जाधव यांनी ब्रिजलाल नगर येथे चल म्हणून आग्रह करू लागले त्यास फिर्यादी याने नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी ऋषिकेश गायकवाड व अविनाश जाधव यांनी त्यांच्या हातातील फायटर व लाकडी काठीने मारहाण केल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
दि.१८ ऑगष्ट रोजी फिर्यादी आपल्या कामावर आपल्या “ज्युपिटर”नावाच्या दुचाकीवरून कामावर जात असताना धारणगाव रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वळला असता आरोपी ऋषिकेश गायकवाड याने,”तू कोठे जात आहे,”तू आमचे सोबत चल” असे म्हणाला असता फिर्यादी पवार याने त्यास नकार दिल्याचा राग येऊन त्याने फिर्यादिस फायटरच्या वापर करून डोक्यावर मारहाण केली असून त्याचा मित्र अविनाश जाधव याने आपल्या हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करून गंभीर जखमी करुन फिर्यादिस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फियादी कृष्णा पवार हा लक्ष्मीनगर येथील रहिवाशी असून आपल्या आई,वडील,भाऊ असे एकत्र राहतात व तो शहरातील एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुलीची नोकरी करतो.यापूर्वी आरोपी ऋषिकेश गायकवाड व फिर्यादी यांचे शिर्डी येथे काही कारणावरून वाद झाले होते.मात्र ते नंतर आपापसात मिटवले होते.त्या नंतरही आरोपी गायकवाड याने फिर्यादिस शिर्डी येथे पुन्हा एकदा अडवून शिवीगाळ केली होती.मात्र या बाबत फिर्यादीचे तक्रार केली नव्हती.मात्र मंगळवार दि.१८ ऑगष्ट रोजी फिर्यादी आपल्या कामावर आपल्या “ज्युपिटर”नावाच्या दुचाकीवरून कामावर जात असताना धारणगाव रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वळला असता आरोपी ऋषिकेश गायकवाड याने,”तू कोठे जात आहे,”तू आमचे सोबत चल” असे म्हणाला असता फिर्यादी पवार याने त्यास नकार दिल्याचा राग येऊन त्याने फिर्यादिस फायटरच्या वापर करून डोक्यावर मारहाण केली असून त्याचा मित्र अविनाश जाधव याने आपल्या हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करून गंभीर जखमी करुन फिर्यादिस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी याने आरोपी ऋषिकेश गायकवाड व आरोपी अविनाश जाधव यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.५२८/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.