जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दिव्यांगांना विविध वस्तूंचे वाटप उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने नुकतेच दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते विविध साहित्याचे नुकतेच वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

वय वर्ष सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या ८६ व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.१.१ दशलक्ष वसाहतींमधील १९२ दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी,राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.

६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या ८६ व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.१.१ दशलक्ष वसाहतींमधील १९२ दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी,राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात.या उपक्रमांतर्गत कोपरगाव पंचायत समितीने हा उपक्रम राबविला आहे.दरम्यान त्यात १० श्रवण यंत्र,१५ एम.आर. किट,६ व्हीलचेअर (छोटी),३ व्हील चेअर (मोठी),५ रोलेटर,९ कॅलियर,५ सी.पी.चेयर आदी साहित्याचा समावेश आहे.तर वारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांच्या निधीतून उक्कडगाव येथील ४० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,गटशिक्षण अधीकारी पोपट काळे,नानासाहेब निकम,रवींद्र निकम,हिरामण गुंजाळ,आप्पासाहेब निकम,राजेंद्र निकम,नानासाहेब बागुल,नानासाहेब त्रिभुवन,बाळासाहेब निकम,सचिन निकम,किरण निकम,मधुकर निकम सर्व केंद्र प्रमुख,लाभार्थी विद्यार्थी आदी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close