कोपरगाव तालुका
गोदावरी बायोरिफायनरीचे पी.के.आर.नायर कालवश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया गोदावरी बायोरिफायनरी सुमारे चाळीस वर्ष सेवा बजावणारे माजी संचालक पी.के.नायर यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाबद्दल वारी,कान्हेगाव परिसरात अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
के.पी.के.रविंद्रन नायर,ज्यांचा जन्म १९३४ साली कोल्लम,केरळ येथे झाला होता.त्यांनी गोदावरी बायोरिफाइनरेस लि. साकरवाडी येथे ४० वर्षे नोकरी केली. काम करताना आपल्या हुशारी व मेहनतीतून त्यांनी संचालक पदापर्यंत मजल मारली होती. त्यांना अनूप नायर अनिल नायर ही दोन मुले व डॉ. अनिता नायर (यूएसए.) एक मुलगी आहे. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे कोरेगाव पार्क येथे राहत होते.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया गोदावरी बायोरिफायनरी मालक समीर शेठ सोमय्या,संचालक एस. मोहन,उपमहाव्यवस्थापक मधुकर दराडे यांनी गोदावरी बायोरिफायनरीचे माजी संचालक पी. के.आर. नायर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.के.पी.के.रविंद्रन नायर,ज्यांचा जन्म १९३४ साली कोल्लम,केरळ येथे झाला होता.त्यांनी गोदावरी बायोरिफाइनरेस लि. साकरवाडी येथे ४० वर्षे नोकरी केली. काम करताना आपल्या हुशारी व मेहनतीतून त्यांनी संचालक पदापर्यंत मजल मारली होती. त्यांना अनूप नायर अनिल नायर ही दोन मुले व डॉ. अनिता नायर (यूएसए.) एक मुलगी आहे. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे कोरेगाव पार्क येथे राहत होते. रविवारी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोरेगाव पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सोमवारी गोदावरी बायोरिफायनरी साकरवाडी येथे अधिकारी व कामगारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.