कोपरगाव तालुका
संस्कार,संस्कृतीतून मिळते विलक्षण उर्जा-डॉ.बडदे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रत्येकाच्या जीवनात संस्कार,संस्कृती आणि सकारात्मकेतून विलक्षण उर्जा मिळत असते व त्यातूनच मनुष्य जीवन मार्गक्रमण करत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेने आयोजित कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत परंपरागत दीपावली-पाडवा निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धा २०१८-२०१९ चे प्रातिनिधिक बक्षिस वितरण करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
सूर्यतेज संस्थेव्दारे २० वर्षापासून शैक्षणिक,कला-सांस्कृतिक,सामाजिक असे विविध व वैशिष्ट्यपूर्ण समाजोपयोगी कार्य निरंतरपणे सुरु आहे.उपस्थितांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे.बक्षिस विजेत्यांना पैठणी सोबत भेट वस्तू ऐवजी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य काँथ व गुडुची या संसर्ग आजार प्रतिकारक्षम औषधे भेट देण्यात आली.
याप्रसंगी लघु-पशू चिकित्सा अधिकारी डॉ.श्रध्दा काटे,राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड,माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील,वकील संघाच्या माजी उपाध्यक्षा अँड.स्मिता जोशी,प्रगतशिल शेतकरी शेखर देशमुख,सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.
सूर्यतेज संस्थेव्दारे २० वर्षापासून शैक्षणिक,कला-सांस्कृतिक,सामाजिक असे विविध व वैशिष्ट्यपूर्ण समाजोपयोगी कार्य निरंतरपणे सुरु आहे.उपस्थितांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे.बक्षिस विजेत्यांना पैठणी सोबत भेट वस्तू ऐवजी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य काँथ व गुडुची या संसर्ग आजार प्रतिकारक्षम औषधे भेट देण्यात आली.
या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रथम क्रमांक सन्मानित कोमल खर्डे (पारंपरिक),दिपु पंजाबी (व्यंगचित्र),निशा आहेर (पारंपरिक),नेहा वहाडणे (निसर्ग चित्र),यश तासकर (व्यक्ती चित्र),रेखा कुमावत (सामाजिक विषय),आदिती नाईक (व्यंगचित्र) यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.रांगोळीकार शितल लोंढे,दिपाली डहारे यांचा सन्मान करण्यात आला.तर उर्वरित विजेत्यांना संस्थेचे सदस्य व नोंदणी केंद्रावरुन वितरण केले आहे.उपस्थितीतांचे स्वागत सूर्यतेजचे प्रा.अतुल कोताडे तर आभार मिलिंद जोशी यांनी मानले.सूत्रसंचलन कलाशिक्षिका माधवी पेटकर यांनी केले.