जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रांजणगाव देशमुख जलसिंचन योजनेच्या पाण्याचे पूजन !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे अवर्षणग्रस्त समजल्या जाणाऱ्या तेरा गावांना पिण्यासाठी व भूजल पातळी वाढण्यासाठी मदतगार ठरणाऱ्या उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे आज कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी जलपूजन केले आहे.

निळवंडेचे पाणी “निळवंडे कालवा कृती समितीने” न्यायिक मार्गाने सोडवून या प्रकल्पाचे पाणी मिळण्यास अवघा एक ते दीड वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला असताना हे उदघाटन संपन्न होत आहे.विशेष म्हणजे हो योजना गोदावरी कालव्यांना येणाऱ्या पूर पाण्यावर अवलंबुन आहे.मात्र हे पूर पाणी २००५ च्या समन्यायी कायद्यामुळे संपुष्टात आले आहे.अशा वेळी हो योजनेची विश्वासार्हता ती किती असणार आहे.हा खरा प्रश्न आहे.

सदर योजना ३.९३ कोटी रुपये खर्चाची होती ती त्यावेळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी खा.सूर्यभान पा.वहाडणे यांनी या भागातील उजनी कृती समितीने १९९३ साली व त्या नंतर वेळोवेळी केलेल्या आंदोलनानंतर मंजूर केली होती.त्या नंतर १९९९ साली राणे सरकारने मुदतपूर्व राजीनामा दिल्याने व त्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती शासनाचा पराभव झाल्याने सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने या योजनेला तिलांजली दिली होती त्यात त्यावेळचे आ.शंकरराव कोल्हे यांचा मोठा वाटा होता.त्या नंतर वेळोवेळी प्रत्येक निवडणुकीत या प्रश्नाचे राजकारण होऊन मतांसाठी या योजनेचे गाजर या तेरा गावातील मतदारांना दाखवले गेले होते.२००४ साली निवडून येणाऱ्या आमदारांनी आपण जोपर्यंत या योजनचे पाणी येत नाही तो पर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी शपथ खाऊनही उपयोग झाला नव्हता.त्यांचा दहा वर्षांचा कालावधी वाऱ्या सारखा उडून गेला मात्र योजना काही पुरी झाली नाही.या योजनेचे अनेकदा तत्कालीन उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनीही विधानसभा निवडणुकी पूर्वी मतांच्या पेट्या भरण्यासाठी उदघाटने केली मात्र निवडणुकी नंतर ते सर्व फोल ठरल्याचा इतिहास आहे.आता आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा हा प्रश्न उकरून काढला आहे.तो आता निळवंडेचे पाणी निळवंडे कालवा कृती समितीने न्यायिक मार्गाने सोडवून या प्रकल्पाचे पाणी मिळण्यास अवघा एक ते दीड वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला असताना हे उदघाटन संपन्न होत आहे.विशेष म्हणजे हो योजना गोदावरी कालव्यांना येणाऱ्या पूर पाण्यावर अवलंबुन आहे.मात्र हे पूर पाणी २००५ च्या समन्यायी कायद्यामुळे संपुष्टात आले आहे.अशा वेळी हो योजनेची विश्वासार्हता ती किती असणार आहे.हा खरा प्रश्न आहे.कारण खाली जायकवाडी धरण ३६ टक्के भरल्याशिवाय नगर-नाशिक मधील धरणे भरण्यास व पाणी अडविण्यास परवानगी नाही हे विशेष !

अशा परिस्थितीत हि योजना कशी चालणार याचे उत्तर कोणीही उत्तर द्यायला तयार नाही.या पार्श्वभूमीवर हे जल पूजन संपन्न झाले आहे.त्यावर या योजनेवर या परिसरातील ग्रामस्थांनी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या उजनी उपसा जलसिंचन योजनेद्वारे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी, वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावांतील साठवण तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे.व आपला निवडणुकीतील शब्द खरा केल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांच्याकडून करण्यात आला आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,रोहिदास होन,के.डी. खालकर,अॅड. योगेश खालकर, सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे,अनिल खालकर,अरुण कोल्हे,लक्ष्मण थोरात,नाना नेहे,ज्ञानदेव नेहे,प्रभाकर गुंजाळ,युवराज गांगवे,सिकंदर इनामदार,अशोक नेहे, वाल्मिक वाकचौरे,निळवंडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता जी.एम.संघांनी,श्री.लव्हाटे,श्री.ढिकले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close