जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या टपऱ्यामुळे उदरनिर्वाह करण्यास मदत-आ.काळे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूज सेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या चर्मकार बंधूंना मिळालेल्या हक्काच्या छतातून आपल्या चर्मोद्योगाला चालना देवून आपल्या कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष साधावा असे आवाहन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी केले आहे.

चर्मोद्योग हा महाराष्ट्र राज्यातील एक महतत्त्वाचा उद्योग असून त्यामध्ये दुर्बल वर्गांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने काम करतात. या उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळाची स्थापना केली. एप्रिल १९७७–१३ डिसेंबर १९७८ या काळात हे महामंडळ महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची दुय्यम संस्था म्हणून काम करीत होते. त्यानंतर ते पूर्ववत् स्वतंत्र करण्यात आले आहे.

संत रोहिदास महाराज चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जवळपास ४४ लाभार्थ्यांना ४० हजार रुपये किंमतीचे १७.६० लाख रुपयांचे पत्रा स्टॉलचे व व्यवसाय साहित्य घेण्यासाठी रोख स्वरूपात २२ हजार रुपयांचे वितरण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,चेर्मोद्योग जिल्हा व्यवस्थापक एस.एम.तडवी,समाज कल्याण निरीक्षक बी.व्ही. देव्हारे,अमोल राऊत, जिनिंगचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,नगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार,अजीज शेख,प्रसाद साबळे,डॉ. तुषार गलांडे, अॅड.मनोज कडू,रावसाहेब साठे,राधा गवळी,सुनिता पोटे,पोपट दुशिंग,चांगदेव भागवत,राजेंद्र कांबळे,संतोष बनसोडे,भास्कर कांबळे,नंदकुमार कांबळे आदी लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी आ. काळे म्हणाले की,समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. त्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला उन्हा-तान्हात व वेळप्रसंगी पावसात बसून चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्त करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी हातांना पाऊस व उन्हा-तान्हापासून संरक्षण मिळावे. या व्यावसायिकांनी तयार केलेल्या मालाला सुरक्षित जागा मिळावी. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या अशा व्यावसायिकांचे जीवनमान उंचावून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन आ. काळे यांनी शेवटी दिले सांगितले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close