जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात रुग्ण वाढीत आली घट,टाळेबंदीस नकार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूज सेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला असला तरी गत दोन दिवसापासून रुग्ण वाढीला आळा बसला असून आज सलग दुसऱ्या दिवशीही हा उतार कायम असून आज कोपरगावसह पोहेगावात केवळ ७ रुग्ण तर नगर सिव्हिल हॉस्पिटल येथील २ जण असे ९ जण बाधित निघाले असून यात कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील २७ वर्षीय तरुणीचा समावेश असून त्या शिवाय भवानी चौक येथील एक ४८ वर्षीय इसम धारणगाव रोड येथील ५८ वर्षीय इसम व ५२ वर्षीय महिला या दोघांचा तर कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील एक ५० वर्षीय इसम यांचा समावेश आहे.याशिवाय पोहेगाव येथील एक ३१ वर्षीय तर दुसरा ३१ वर्षीय इसमाचा या बाधित रुग्णांत समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

वर्तमानस्थितीत कोरोना रुणांचा आलेख उतरत्या क्रमाने असल्याने जनता संचारबंदी लागू न करता,येणाऱ्या काळात जर अजून जास्त धोकादायक पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते.त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही- विजय वहाडणे

कोपरगावात गत सप्ताहात एकाच दिवशी ६५ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.त्या खालोखाल तिसच्या वर रुग्ण आढळत होते त्यामुळॆ नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते मात्र आता अँटीजन रॅपिड टेस्ट मुळे तातडीने तपासणी होत असल्याने आता तपासणीच्या कामास वेग आला आहे.आता आतापर्यंत एकूण २ हजार 0८४ रुग्णांची तपासणी केलीय असून त्यात ३५१ जण बाधित रुग्ण आढळले आहे.यात आता वर्तमानात १३६ रुग्ण सक्रिय आहे.आतापर्यंत चांदेकसारे येथील रुग्णांचा समावेश धरून पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.आता पर्यंत उपचार करून बरे होणाऱ्या २१० रुग्णांचा समावेश आहे.हा दर टक्केवारीत ५९.८२ असा असल्याचेही डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी सांगितलें आहे.

आता बाधित रुग्णांचा वाढता दर घटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज या संबंधी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यापारी व नागरिकांची आपल्या दालनात बैठक घेतली आहे.मात्र या बाबत बंदला नागरिकांनी नापसंती दर्शविली असल्याची माहिती हाती आली आहे.

याबाबत कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव भयावह वेगाने वाढतो आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी पुन्हा जनता संचारबंदी करावी कि नाही यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषद येथे हि बैठक बोलावली होती.यावेळी जनता संचारबंदीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे होणारे हाल,व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे,कोविड केंद्रावरील स्वच्छता,बाहेर गांवाहून आलेल्या पाहुण्यांबद्दल प्रशासनाला माहिती देणे,कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जागृती करणे इ. विषयांवर चर्चा झाली.
यावेळी इंडियन मेडिकल असोशिअशनचे डॉ.जोर्वेकर,डॉ.तिरमखे,कैलास जाधव,चेतन खुबानी,शरद त्रिभुवन,अकबर शेख,उमेश धुमाळ,शरद खरात,योगेश वाणी,सुशांत खैरे,अंकुश वाघ,सतीश जाधव,धनंजय कहार,गणेश लकारे आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला आहे.
सविस्तर चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले कि,सद्यस्थितीत जनता संचारबंदी लागू न करता,येणाऱ्या काळात जर अजून जास्त धोकादायक पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते.यावेळी विजय वहाडणे यांनी कोरोनाशी रात्रंदिवस लढणाऱ्या प्रशासनाचे अभिनंदन केले व यानंतरही प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close