सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे या वर्षी डाळींब उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे अशा वातावरणामुळे डाळींब फळावर तेल्या व टिपका रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी,सुरेगाव,शहजापुर,कोळगाव थडी या गावांच्या परिसरात दिसून येत आहे. परिसरातील बागा या रोगामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.अनेक छोट्या शेतकऱ्यांनी कमी पाणी असल्याने बागा केल्या आहेत व अशा महामारिने शेतकरी उध्वस्त झाले आहे.
लोक डाळींब शेतकऱ्यांना मोठे समजतात पण वास्तव परिस्थिती नाही.या परिसरात पाणी कमी झाल्याने शेतकरी ऊसाकडुन डाळींब पिकाकडे आपला मोर्चा वळवला होता पण त्यातही शेतकरी अडचणीत आले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था, “बडा घर पोकळ वासा” अशी झाली आहे.तरी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करत या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत करावी-मागणी
काही शेतकऱ्यांनी ही फळे तोडून बाजारात नेल्या असता २० रूपये क्रेट या किमान भावात देऊन आले आहेत.काही शेतकऱ्यांनी रोजंदारीवर मजूर लावून फळे तोडून फेकून दिली असल्याचे दिसत आहे.डाळींब पिक उभारण्यावर व त्याच्या देखभालीवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहे. त्यात कोरोना महामारीने डाळींब बाजार अड्चणीत आल्याचे व्यापारी सांगून शेतकऱ्यांची लूट करत आहेत.त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.त्याला आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
डाळींब शेतकरी मागील वर्षी सूरेगाव सजेतील विम्या पासून वंचित राहिले आहे.ही सजा व शेतकरी विमा न मिळाल्याने थकले आहेत व या वर्षी तेल्यामुळे अडचणीत आला आहे. डाळींब शेतकरी सावरावे या साठी सरकारने या शेतकऱ्या चा बागेचे पंचनामे करून मदत द्यावी अशी सरकारला विनंती अशी मागणी कोळपेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डाळींब उत्पादक शेतकरी कचरू पाटील कोळपे यांनी दिली आहे.
लोक डाळींब शेतकऱ्यांना मोठे समजतात पण वास्तव परिस्थिती नाही.या परिसरात पाणी कमी झाल्याने शेतकरी ऊसाकडुन डाळींब पिकाकडे आपला मोर्चा वळवला होता पण त्यातही शेतकरी अडचणीत आले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था,”बडा घर पोकळ वासा अशी झाली असल्याचे दिसत आहे.तरी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करत या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.