कोपरगाव तालुका
अण्णाभाऊ साठे यांची जयंती..या कार्यालयात होणार साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगतीपथावर असल्याने त्या ठिकाणी त्यांची जयंती कार्यक्रम साजरा करता येणे शक्य नाही म्हणून हि जयंती कोपरगाव नगरपरिषदेचे वर्तमान कार्यालय असलेल्या ठिकाणी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि प्रसिद्ध लेखक होते साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते,सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या देशासह परदेशातही प्रसिद्ध आहेत.
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि प्रसिद्ध लेखक होते साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते,सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या देशासह परदेशातही प्रसिद्ध आहेत.त्यांची जयंती एक ऑगष्ट रोजी साजरी करण्यात येते.मात्र यावर्षी कोपरगावात त्यांच्या पुतळ्याचे काम सुरु असल्याने हि जयंती साजरी करण्यात अडचण आली आहे.त्यामुळे नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हि माहिती नागरिकांना दिली आहे.प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की,”लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी नगरपरिषदेच्या वतीने येवला रोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साजरी करण्यात येते.मात्र या वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे बांधकाम सुरु आहे.त्यामुळे सदर जागेवरील अर्धाकृती पुतळा हा नगरपरिषद कार्यालयात ठेवण्यात आलेला असून दि.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दीवर्षा निमित्त समाज बांधव व अण्णाभाऊ साठे प्रेमी नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे सकाळी १०.०० वा. नियोजन केलेले आहे. तरी नागरिकांनी टाळेबंदीच्या काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सुरक्षित अंतराचे पालन करून अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष वाहाडणे यांनी शेवटी केले आहे.