जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुखपट्टी नाही,तालुका पोलिसांची वीस जणांविरुद्ध कारवाई

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही वाढत असून त्या साठी पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून गत तीन दिवसात केलेल्या कारवाईत वीस नागरिकांवर मुखपट्टी न बांधल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.



कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,वेळापूर,करंजी,रवंदे,समतानगर,काले मळा,पढेगाव येथे मोठ्या संख्येने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र ज्या नाठाळ नागरिकांना प्रशासनाची सबुरीची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिस आपल्या अधिकाराचा वापर करत आहेत.


कोपरगाव शहरात व तालुक्यात काल अखेर अकरा रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु आहे तर अनेकांना विलगीकरण करण्याची मोहीम सुरू आहे.तर अनेक जण उपचारानंतर बरे होऊन घरी येत आहे.तर अनेकांच्या तपासण्यात ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव शहरात सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या खेरीज,सुरेगाव,वेळापूर,करंजी,रवंदे,समतानगर,काले मळा,पढेगाव येथे मोठ्या संख्येने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र ज्या नाठाळ नागरिकांना प्रशासनाची सबुरीची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिस आपल्या अधिकाराचा वापर करत आहेत.तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे.त्यामुळे तालुका पोलिसानी तीन दिवसापासून केलेल्या कारवाईत
बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी राजेंद्र मारुती कदम (वय-२७)रा.कुंभारी कोपरगाव,प्रकाश दत्तू निकम (वय-४१) रा.सुरेगाव,दिगंबर चांगदेव चतुर (वय-३०) कुंभारी,शरद रामदास पानगव्हाने (वय-२४),रा.माहेगाव देशमुख,गणेश नवनाथ तांबे (वय-२७) रा.करंजी,कोपरगाव,चंद्रकांत चांगदेव साबळे (वय-२५) माहेगाव देशमुख,अमोल शामसुंदर बैरागी (वय-२४) माहेगाव देशमुख,गणेश साहेबराव दवंगे (वय-२९) मळेगाव थडी,प्रसाद रामराव साळुंके (वय-३०) कुंभारी,शाहिद बाबूभाई शेख,(वय-३९) कुंभारी,आबासाहेब कारभारी काकड (वय-५५) माहेगाव देशमुख,गोरख सोपान सरोदे (वय-२१) कोळपेवाडी,अशिष रमेश कदम (वय-२३) रा.कोळगाव माळ,ता.सिन्नर,रावसाहेब वेणूनाथ जुंधारे (वय-३५) मळेगाव थडी,संकेत नारायण काकड (वय-२३) मळेगाव थडी,जगन्नाथ भागवत उबाळे (वय-५२) दहिवाडी ता.सिन्नर,गोविंद माणिकराव दवंगे (वय-३५) मळेगाव थडी,रावसाहेब सोपान शिंदे (वय-४२),माहेगाव देशमुख,अशोक सदाशिव भोकरे (वय-३५) मुर्शदपूर फाटा,नाना देवराम चव्हाण (वय-४८) रा.सोनार वस्ती कोपरगाव आदींसह अन्य पाच जणांवर कारवाई केली आहे.यांनी विविध क्रमांकाच्या विविध दुचाकी,चारचाकीवरून प्रवास करताना कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मोकटपणे फिरताना आढळून आले आहे.


त्यांच्या विरुद्ध फिर्यादी पोलिसानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१८५ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close