कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात महिला पोलिसांची संख्या वाढवा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील महिलांची संख्या व पोलीस ठाण्यात महिला पोलिसांची संख्या यांचे प्रमाण विषम असून महिला पोलिसांनाही संख्या वाढविणे गरजेचे असल्याची मागणी कोपरगाव येथील अड्.योगेश खालकर यांनी नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मधील तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदांवरील भरतीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण पदांच्या ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच महिला व बालविकास शासन निर्णयातील तरतुदीनुसार पोलीस उपअधीक्षक,सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक या पदासाठीच्या सरळसेवा भरतीमध्ये एकूण पदांच्या ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी महिला पोलिसांची संख्या वाढवण्याबरोबरच महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष सक्रिय करण्यात आल्याचा दावा सरकारतर्फे मोठा कंठघोष करून करण्यात येत असला,तरी राज्यात महिला पोलिसांचे प्रमाण केवळ १२.८० टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयांमधील तरतुदीनुसार शासकीय,निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांच्या सेवांमध्ये नियुक्तीत महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत,पण अजूनही महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत फारशी वाढ होऊ शकली नाही.राज्य पोलीस दलामध्ये सद्यस्थितीत एकूण दोन लाख सहा हजार ८० पोलीस आधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी २६ हजार ३९६ महिला आहेत. (१२.८० टक्के) त्यात एक हजार ६३२ महिला पोलीस अधिकारी तर २४ हजार ४६४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षितता वाटावी आणि पोलिसांकडून अनुकूल वागणूक मिळावी,यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस अधिकारी आणि सहा महिला पोलीस शिपायांची नेमणूक करण्याच्या सूचना गृह विभागाने सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत,पण अजूनही अनेक ठिकाणी महिला पोलिसांची कमतरता जाणवत आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सरासरी चार ते १४ महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.मात्र कोपरगावही या महिला कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.शहराची लोकसंख्या जवळ्पास एक लाख आहे त्यात महिला संख्या पन्नास टक्के गृहीत धरली तर महिला पोलिसांची संख्या निम्मी हवी मात्र ते शक्य नसले तरी वरील निकषा प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस अधिकारी आणि सहा महिला पोलीस शिपायांची नेमणूक करण्याच्या सूचना गृह विभागाने सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत मात्र हे प्रमाण कोपरगावात केवळ दोन महिला कर्मचारी पाडत आहे.त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.त्यामुळे अजून किमान दहा महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रश्नी लक्ष घालून कोपरगाव शहरातील महिलांना न्याय द्यावा शि मागणीही अड्,योगेश खालकर यांनी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांचेकडे शेवटी केली आहे.