जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात रात्री पुन्हा रुग्ण संख्येत मोठी वाढ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज दुपारी तीन रुग्ण निघाले असताना आज रात्री पुन्हा २१ रॅपिड टेस्ट केल्या असता त्यात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यात आलेल्या अहवालात काले मळ्यातील ३ महिला आढळल्या आहेत त्यात २४,२९, व ५९ वर्षीय महिला तर एक समतानगर येथील एक पन्नास वर्षीचा पुरुष असे चार कोरोना बाधित आढळले आहे. या खेरीज एका खाजगी प्रयोग शाळेने पाठवलेल्या ४ अहवालात निवारा परिसरात तीन पुरुष त्यात ४० वर्षीय वडील,३८ वर्षीय पत्नी व अनुक्रमे १४ व ९ वर्षाचा मुलगा असे चार असे एकूण आठ रुग्ण कोरोना बाधित आढळले असून आज दिवसभरात एकूण ११ रुग्ण आढळले असून हा सुरेगाव नंतर सर्वाधिक कोरोना वाढीचा विक्रम नोंदला गेला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात अद्यापपर्यंत या साथीत कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेलेले आहेत.या घटनेने प्रशासन अजून सतर्क झाले आहे.व पोलिसानी आणखी कडक धोरण अवलंबले असून शहरात व तालुक्यात प्रतिबंधात्मक कारवाईसह मुखपट्टी न बांधणाऱ्या बेताल नागरिकांवर कारवाईची संख्या वाढल्याच्या घटनांत वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी आता आणखी रुग्ण वाढ न होण्यासाठी सतर्क राहून प्रशासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोपरगाव शहरात अद्याप कोरोना बाधित रुग्ण थांबण्याचे नाव घेत नसून दि.२३ जुलै पाठवलेल्या १२ जणांचे अहवाल आज सकाळी आले असून यात पॉवर हाऊस नजीक कोर्ट रोड येथील डॉक्टर च्या कुटुंबातील पत्नी (वय-६०),मुलगा(३४),सून (२९) असे तिघे बाधित आल्याचे निष्पन्न झाले असून ९ जण निरंक आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आज दुपारी दिली होती.त्यानंतर रात्री उशिरा हि माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे आता कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्ण संख्या ४७ वर पोहचली आहे.कोपरगाव तालुक्यात अद्यापपर्यंत या साथीत कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेलेले आहेत.या घटनेने प्रशासन अजून सतर्क झाले आहे.व पोलिसानी आणखी कडक धोरण अवलंबले असून शहरात व तालुक्यात प्रतिबंधात्मक कारवाईसह मुखपट्टी न बांधणाऱ्या बेताल नागरिकांवर कारवाईची संख्या वाढल्याच्या घटनांत वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी आता आणखी रुग्ण वाढ न होण्यासाठी सतर्क राहून प्रशासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close