जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

घड्याळ खरेदीत,लेखापरिक्षकांचे प्रतिकूल शेरे,कारागृहात पाठवू-माळवे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील विद्यमान सत्ताधार्‍यांनी सभासदांना शताब्दी भेटीकरिता घड्याळ भेट देण्याचा निर्णय घेतला. या घड्याळ खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधा-यांवर होत असताना व या प्रकरणाची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिलेले असताना आता घड्याळ खरेदी प्रकियेवर बँकेच्या लेखापरिक्षकांनीच ताशेरे ओढल्यामुळे ही घड्याळ खरेदी वादाच्या भोवर्‍यात अडकली असल्याची माहीती सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी दिली आहे.

घड्याळ खरेदी करिता काढलेली निविदा ही राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती. तरीही त्या निविदेची कात्रणे कुणाच्या माध्यमामधून गुजरातमधील कंपनीपर्यंत पोहोचली.दिनांक १७ डिसेंबर २०१९ च्या संचालक बैठकीतील ठराव क्र.२१ अन्वये ज्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.त्या कंपनीस दर निर्धारणासाठी बोलावण्याचे ठरले परंतु ठरलेल्या तारखेस कंपनीचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.

त्याच हितसंबंधातून स्थानिक किंवा महाराष्ट्रातील अजंता कंपनीच्या डिलर ऐवजी चार पैकी तीन निविदा थेट गुजरातमधून भरल्या जातात व फक्त एकच निविदा नगरमधून भरली जाते. याचे गौडबंगाल काय ? याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर संचालक मंडळाला लेखापरिक्षकांसमोर देता आलेले नाही.घड्याळ खरेदी करिता काढलेली निविदा ही राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती. तरीही त्या निविदेची कात्रणे कुणाच्या माध्यमामधून गुजरातमधील कंपनीपर्यंत पोहोचली.दिनांक १७ डिसेंबर २०१९ च्या संचालक बैठकीतील ठराव क्र.२१ अन्वये ज्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.त्या कंपनीस दर निर्धारणासाठी बोलावण्याचे ठरले परंतु ठरलेल्या तारखेस कंपनीचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.तरीही केवळ कंपनीने पाठवलेल्या ई- मेलवर किंमत ठरवण्यात आली.रुपये ७२ लाख कंपनीला आगाऊ रक्कम देण्यात आली.म्हणजेच वस्तू ताब्यात येण्याआगोदरच सहा महिने रकमा बँकेकडून कंपनीला देण्यात आली.या बाबतही सत्ताधारी या निविदा धारकावर एवढे मेहेरबान का झाले असतील ? असा प्रश्न लेखापरिक्षणात उपस्थित करण्यात आला आहे.

दिनांक १७ डिसेंबर २०१९ च्या पत्रानुसार शिक्षक बँकेने अजंता एल.एल.पी. कंपनीस घड्याळ खरेदीचा आदेश देण्यात आला. त्यानुसार घड्याळे शिक्षक बँकेत पोहोच होण्यापुर्वीच ७२ लाख रूपये कंपनीस अगाऊ अनामत म्हणून देण्यात आले.एवढी मोठी रक्कम बँकेने एकाच वेळी देणे चुकीचे असल्याचे या लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.यासह अनेक प्रश्न या खरेदीव्यवहारात लेखापरिक्षकांनी उपस्थित केलेले आहेत. एवढी मोठी रक्कम अगाऊ देऊनही घड्याळे ठरलेल्या वेळी पोहोच न होता तब्बल तीन महिने उशीरा आली.याबाबतही बँकेने कुठलीही कारवाई कंपनी विरोधात केली नाही किंवा तसा पत्रव्यवहारही बँकेने त्या ठोक विक्रेत्याशी केला नाही.केवळ माया जमविण्याच्याच उद्देशाने ही घड्याळ खरेदी गुजरातमधून केली असल्याचा केला आहे.कुणाच्या नातेवाईकाने वैयक्तिक हित संबंध जोपासून सत्ताधा-यांना याचा आर्थिक लाभ करून असल्याचा आरोपही माळवे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close