कोपरगाव तालुका
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे-पुर्णाकृती पुतळा,वस्तुस्थिती”
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गेली अनेक वर्षे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शिल्पकाराच्या गोडावूनमध्ये बंद आहे.मी नगराध्यक्षपदी आल्यानंतर हा पुतळा लवकर प्रस्थापित व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यावेळच्या मुख्याधिकारी ताईंनी 2 वर्षे सहकार्यच केले नाही.पण त्यानंतर आलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता दिगंबर वाघ यांनी चांगले सहकार्य करून पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकिय परवानग्या,नाहरकत दाखले मिळविले,त्यासाठी आम्हाला अनेकदा अहमदनगर, मुंबई येथे जावे लागले.
मी प्रयत्नपूर्वक अनेकदा स्व.अण्णाभाऊ साठे प्रेमींच्या बैठका नगरपरिषद कार्यालयात घेतल्या.त्यांच्यात चर्चा घडवून,एकमताने “पुतळा देखभाल समिती” तयार केली. धर्मादाय आयुक्तांकडे समितीची नोंदनीही करून घेतली. चबुतरा उभारण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून कार्यदेश देऊन कामही सुरू करण्यात आले.पण दुर्दैवाने संरक्षक भिंतीच्या बिमवर ट्रॅक्टर धडकला,ट्रॅक्टरचे 3 तुकडे झाले,तरीही बीमचे कामाबद्दल तक्रार झाल्याने काम बंद ठेवावे लागले,कोरोनाचे संकटही आले.आता या कामाचे स्ट्कचरल ऑडिट करण्यात येऊन पुन्हा काम सुरू करण्यास ठेकेदारास सांगितले आहे.आता पावसाळा असूनही चबुतऱ्याचे काम सुरू केलेले आहे.ही वस्तुस्थिती आहे. यातील एकही शब्द चुकीचा नाही.
तरीही एका “विवेकशून्य” नेत्याने कोल्हेकुई सुरू करून “नगरपरिषद ” जाणीवपूर्वक विलंब करीत आहे असा धादांध खोटा आरोप केला आहे.नगरपरिषद अनेक वर्षे ताब्यात असतांना ज्यांना स्व.अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा स्थापित करता आला नाही त्यांनी जास्त हुशारी करू नये.नगरपरिषद लाखो रुपयांची बिले काढते कारण तुम्हाला अनेक वर्षे करता आली नाहीत इतकी कामे या साडेतीन वर्षात सर्वच प्रभागात झालेली आहेत.तुमचे नगरसेवक संख्येने जास्त असल्याने जास्त विकासकामेही तुमच्याच नगरसेवकांच्या प्रभागात झालेली आहेत.काही कोटी रुपये खर्च तुमच्याच नगरसेवकांच्या प्रभागात झालेला आहे.तुमचे म्हणणे असेल तर विकासकामे थांबवून बिलेही थांबवायची माझी तयारी आहे.कोण नगरसेवक कोणत्या ठेकेदारांचे भागीदार आहेत याची जरा निट माहिती घ्या.
खरे तर पोरकट आरोपांना उत्तर द्यायचेच नव्हते,पण जनतेला व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमींना वस्तुस्थिती माहित व्हावी यासाठी उत्तर द्यावे लागले.आता काही भाट चवताळून माझ्याविरुद्ध लिहितील,आरोप करतील हे मला व जनतेलाही चांगलेच माहित आहे.तुमच्याच गटाच्या सौ.राक्षेताई नगराध्यक्षा असतांनाही पुतळा बसवू शकल्या नाहीत.कारण “राक्षे”यांना श्रेय मिळू नये म्हणून तुमच्याच नगरसेवकांनी डावपेच खेळले.आधीचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात मा.मंत्री श्री.शंकरराव कोल्हे साहेबांचा “सिंहाचा” वाटा होता,पण त्यांच्या आताच्या पिढीला “खारीचाही” वाटा उचलता आला नाही हे दुर्दैव आहे.आधी आत्मपरीक्षण करा.खोटे आरोप कराल तर मी उत्तर देणारच हे लक्षात ठेवा.
–विजय वहाडणे