जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आणखी बांधितांच्या संख्येत वाढ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव शहरातील वीज मंडळाच्या पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका दवाखान्याचे एक डॉक्टर बाधित निघाल्यावर त्यांच्या संपर्कात असलेल्या एका चाळीस वर्षाचा इसम व रवंदे येथील बाधित इसमाची पत्नी आज कोरोना बाधित असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे.त्यामुळे ते रहात असलेला साईनगर परिसर तालुका प्रशासकांनीं हा भाग आज प्रतिबंधित केला आहे.त्यामूळे बाधितांची तालुक्यातील संख्या आता छत्तीसवर गेली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः कोपरगाव शहरात त्याचे प्रत्यन्तर येत आहे.साईनगर परिसरात आता चाळिशीतील नागरिक बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.पॉवर हाऊस परिसरातील डॉक्टरच्या संपर्कातील २० संशयितांना आरोग्य विभागाने उचलले होते.त्यात दोघंचा अहवाल बाधित तर बाकी नागरिकांचे अहवाल निरंक आले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज २९ हजार ८४८ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १२ लाख ६९ हजार ५३२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३० हजार २३१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख ३७ हजार ६०७ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १२ हजार ५५६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०२ हजार ३५९ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ती आता ३६ वर गेली आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः कोपरगाव शहरात त्याचे प्रत्यन्तर येत आहे.साईनगर परिसरात आता चाळिशीतील नागरिक बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.पॉवर हाऊस परिसरातील डॉक्टरच्या संपर्कातील २० संशयितांना आरोग्य विभागाने उचलले होते.त्यात दोघांचा अहवाल बाधित तर बाकी नागरिकांचे अहवाल निरंक आले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close