कोपरगाव तालुका
कोपरगावातील विविध कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विविध विकास कामे आपण मंजूर केली असून या प्रगतीपथावरील विकास कामांच्या गुणवत्तेवर पदाधिकारी व नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच शहरात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रतिपादन केली आहे.
कोपरगाव नगरपरिषद विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या कोपरगाव शहर पोलीस ठाणे ते सप्तश्रुंगी मंदिर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,हिरामण गंगुले,सुनील शिलेदार,मेहमूद सय्यद,नवाज कुरेशी,रमेश गवळी,अॅड.मनोज कडू,राजेंद्र जोशी,डॉ.तुषार गलांडे,संतोष टोरपे,प्रा.अंबादास वडांगळे,राहुल देवळालीकर,रावसाहेब साठे,संदीप कपिले,रवींद्र राऊत,प्रकाश दुशिंग,दादामिया शेख,अनिल गायकवाड,सादिक शेख,जाकीर नालबी,अमोल गायकवाड,प्रताप गोसावी,जाफर कुरेशी,फयाज शेख,जाफर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
,
या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”सण-उत्सवाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पोलीस स्टेशन या मार्गावर गतिरोध लावण्यात येतात त्यावेळी शहर पोलीस ठाणे ते सप्तश्रुंगी मंदिर या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना उपयोग होत असतो.परंतु मागील काही वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या प्रभागातील व परिसरातील नागरिकांना व सण उत्सवाच्या काळात शहरवासियांना त्रास होत होता. हा त्रास यापुढे कमी होणार आहे मात्र नागरिकांनी काँक्रीटीकरण झाल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी या मार्गावरून जाणे-येणे टाळावे जेणेकरून रस्त्याचे आयुष्य वाढेल. नगराध्यक्ष व सबंधित नगरसेवकांनी रस्त्याचे काम टिकावू व दर्जेदार होण्यासाठी जातीने लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे. यावेळी आ.काळे यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या प्रगती पथावरील असलेल्या कामाची पाहणी केली.