जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यातील..ते संशयित घेतले ताब्यात

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित तेरा रुग्णांचा अहवाल काल निरंक आला असताना त्याच दिवशी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत नोकरीस असलेला एक इसम (वय-४५) उपचारार्थ नाशिक येथे दाखल असताना तो बाधित असल्याचा अहवाल आल्याने कोपरंगाव तालुक्यात खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने त्या रुग्णाच्या संपर्कातील सतरा जणांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.आज त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान रात्रीच तालुका प्रशासनाने व आरोग्य,पोलीस विभागाने हा परिसर पुन्हा एकदा प्रतिबंधित केला आहे.

दरम्यान सुरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीने गावात बाधित रुग्णांचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून तो बंद केला आहे.आज त्या क्षेत्रात आज जंतुनाशक फवारणी सुरु केली असून अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिक व महिलांची तपासणी सुरु केली आहे.

कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र दि.११ जुलै पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून अकरा जुलै अखेर असलेले प्रलंबित १३ अहवाल प्राप्त होऊन ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली असताना त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सायंकाळी हि धक्कादायक बातमी हाती आली होती.दरम्यान या कुटूंबात चार भाऊ त्यांच्या पत्नी,आई,वडिल असा मोठा परिवार आता संशयितांच्या यादीत असल्याचा अंदाज खरा ठरला असून या कुटुंबासह या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना अरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यानां तातडीने कोपरगाव शहरातील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.त्यासाठी तालुका तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींनी सुरेंगावकडे धाव घेऊन उशिरापर्यंत कष्ट उपसले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close