जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगर-मनमाड मार्गावरील खड्डे बुजवा-अधिकाऱ्यांना निर्देश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर-मनमाड (रा.मा.१०) या राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या राज्यमार्गावर लहान मोठे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढले होते. याची दखल घेवून हे खड्डे तातडीने बुजवावे असे आदेश आ.आशुतोष काळे यांनी जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता राजगुरू यांना दिले आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आपल्याला करावे लागते व ती आपली नैतिक जबाबदारी व कर्तव्य आहे हि जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांना समजत नसेल तर ते अधिकारी सरकारने काय केवळ तिजोरीतून पगार काढण्यासाठी ठेवले आहे काय ? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.अशा अधिकाऱ्यांवर अपघातात निधन झालेल्या व्यक्तींबद्दल सहानुभूती दाखवून यांनी खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यायला हवे मात्र हि मंडळी अधिकाऱ्यांची मिनतवारी करताना दुर्दैवाने दिसत आहे.हि लोकशाहीची मोठी थट्टा असल्याची प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.


अहमदनगर-मनमाड राज्यमार्गाच्या झालेल्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर-मनमाड राज्यमार्गाची कोपरगाव परिसराची दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांनी बैठक घेतली.या राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असून सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे अपघात होण्यात वाढ होवू शकते त्यासाठी या रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. तसेच अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.या परिसरात शाळा, महाविद्यालय,रेल्वे स्टेशन रोड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची सतत मोठी वर्दळ असते.या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून हा राज्यमार्ग ओलांडून जावा लागतो.त्यामुळे वारंवार होणारी हि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याचा देखील आढावा घेण्याच्या सूचना आ. काळे यांनी यावेळी दिल्या.त्यांच्या सूचनेनुसार जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता राजगुरू यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर कोपरगाव परिसरात रस्त्याची पाहणी करून या राज्यमार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजवून देवू असे अभियंता राजगुरू यांनी आ.आशुतोष काळे यांना सागितले आहे.त्यामुळे या राज्यमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close