जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात ठिबक सिंचनचे अनुदान मंजूर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे रखडलेले ठिबक सिंचन अनुदान मिळावे याबाबत राज्याचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे व कृषी आयुक्त यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ४३.९० लाख रुपयांचे अनुदान महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात येवून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

शेतकऱ्यांच्‍या शेतास पाण्‍याची उपलब्‍धता करणे आणि पाण्‍याची कार्यक्षमता वाढवून पाण्‍याच्‍या प्रत्‍येक थेंबातून जास्‍तीत जास्‍त पीक उत्‍पादन मिळविणे या उद्देशाने सन-२०१६-१६ पासून सूक्ष्‍म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेमध्‍ये समाविष्‍ट केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजनेच्‍या केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करताना केंद्र व राज्‍य हिश्‍श्‍याच्‍या अर्थसहाय्याचे प्रमाण ६०-४० करण्‍यात आलेले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्‍ये प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजना २०१५-१६ पासून राज्‍यामध्‍ये राबविण्‍यात येत असून सन-२०१७-१८ मध्‍ये सदर योजना राज्‍यातील सर्व ३४ जिल्‍ह्यांमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्‍यासाठी ३८० कोटी निधीची तरतूद केलेली आहे. केंद्र हिस्‍सा रक्‍कम ३८० कोटी व त्‍यास पुरक राज्‍य हिस्‍सा रक्‍कम २४०.६७ कोटी असा एकूण ६२०.६७ कोटी निधी उपलब्‍ध होणार असल्याचे जाहीर केलेले आहे.या अनुदानाच्या भरवशावर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ठिबक संच खरेदी करूनही शेतकरी ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित राहिले होते.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील २०१९/२० या वर्षाचे ठिबक अनुदान मिळावे यासाठी आ.काळे शासनदरबारी पाठपुरावा करीत होते. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे अहमदनगर येथे सन-२०२० च्या खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी आले असता आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबरोबरच ठिबकचे थकीत अनुदान मिळावे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता याबाबत कृषी मंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

तत्पुर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची देखील पुणे येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेवून त्यांच्याकडे देखील शेतकऱ्यांचे थकीत ठिबक अनुदान तातडीने मिळावे अशी मागणी केली होती.या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ठीबकचे अनुदान मिळविण्यात यश मिळाले असल्याचा दावा त्यानी केला आहे. व उवर्रीत शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना ठीबकचे अनुदान देवून खरीप हंगामासाठी अतिशय योग्य वेळी मदत केल्याबद्दल आ.काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे. कोरोनाच्या संकटात दिलेली अतिरिक्त जबाबदारी सांभाळून कोपरगाव तालुका कृषी विभागाने प्रस्तावांची वेळेत तपासणी करून सदर लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करणे बाबत तातडीने कार्यवाही केली याबद्दल आ.काळे यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव त्यांचे सहकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close