जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील साई सिटी या उपनगरात रहिवाशी असलेले फिर्यादी डॉ.यशवंत माधवराव बारहाते (वय-५०) यांच्या मालकीची असलेली रॉयल इनफिल्ड क्लासिक बुलेट हि दुचाकी ( क्रं.एम.एच.१७,बी.सी.६११६) अंदाजे किंमत ५५ हजार रुपयांची अज्ञात चोरट्याने आपल्या फायद्यासाठी त्यांच्या घरासमोर रात्री उभी करून ठेवली असता चोरून नेली असल्याची फिर्यादी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने दुचाकी स्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी डॉ.यशवंत बारहाते यांनी दि.२६ जूनच्या रात्री आपल्या घरासमोर उभी केली असता अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी चोरून नेली आहे.या बाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.२३२/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने कोपरगाव शहरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close