जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगावात,’गुरु पौर्णिमा उत्सवा’चे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील जुनी गंगा येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.०३ जुलै रोजी राष्ट्र संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु पूर्णिमा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा या उत्सवास ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात कारण यादिवशी वेदव्यास या थोर ऋषीचा जन्म झाला होता.त्यांना हिंदू परंपरेतील सर्वात प्रभावशाली गुरू आणि गुरु-शिष्य व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की या दिवशी त्याने आपली प्रसिद्ध रचना ब्रह्मसूत्र लिहिले.त्यांचे शिष्य या दिवशी या सूत्रांचे पठण करतात आणि त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धा आणि आदर दर्शविण्यासाठी हा उत्सव श्री क्षेत्र कोपरगाव येथे संपन्न होत आहे.

हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा या उत्सवास ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात कारण यादिवशी वेदव्यास या थोर ऋषीचा जन्म झाला होता.त्यांना हिंदू परंपरेतील सर्वात प्रभावशाली गुरू आणि गुरु-शिष्य व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की या दिवशी त्याने आपली प्रसिद्ध रचना ब्रह्मसूत्र लिहिले.त्यांचे शिष्य या दिवशी या सूत्रांचे पठण करतात आणि त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धा आणि आदर दर्शविण्यासाठी हा उत्सव संपन्न होत आहे.कोपरगाव बेट येथेही हा उत्सव संपन्न होत आहे.त्यासाठी नुकतीच एका ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

सदर प्रसंगी उपाध्यक्ष विलास कोते,अंबादास अंत्रे,त्र्यंबक पाटील,रामकृष्ण कोकाटे,अनिल जाधव,आशुतोष पाणगव्हाने,संदीप चव्हाण,अतुल शिंदे,शिवनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या दिवशी पहाटे ०४ वाजता संत जनार्दन स्वामी यांच्या समाधीची महापूजा,सकाळी ०५ वाजता नित्यनियम विधी,सकाळी ०७ वाजता सत्संग प्रवचन,सकाळी ०८ वाजता बाबाजींची पादुकांची पूजा मूर्तीची षोडपचार महापूजा,सकाळी १० वाजता साधू संतांचे प्रवचन संपन्न होणार आहे.त्या नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करणार आहे.

सदर प्रसंगी रमेशगीरी महाराज,दत्तगिरीजी महाराज,माधवगिरीजी महाराज,स्वामी मधूगिरीजी महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.दरम्यान या पूजेचे पौरोहित्य प्रशांत शिखरे हे करणार आहे.सायंकाळी ०७.३० वाजता जनार्दन स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे.सदर उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या उत्सवास भाविकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते,सचिव अंबादास अंत्रे,विश्वस्त त्र्यंबक पाटील,रामकृष्ण कोकाटे,अनिल जाधव,आशुतोष पाणगव्हाने,बाळासाहेब मोहनराव चव्हाण,अतुल शिंदे,शिवनाथ शिंदे आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close