जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ई-पास न काढता प्रवास,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रातिनिधी)

वर्तमानात कोरोना साथ सुरु असतानाही स्थलांतर करून या साथीचा प्रसार होऊ शकतो असे माहिती असतानाही विविध ठिकाणाहून ई-पास न घेता प्रवास करून कोपरगावात आलेल्या दहा स्त्री-पुरुषाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसानी विविध तीन गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मध्यन्तरी एक महिला डॉक्टरचा अपवाद ठरवता संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आरोग्य विभागाने हा रुग्ण परिसर पूर्ण बंद केला असताना आता मुंबई पुणे, मनमाड,वैजापूर,येवला आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता या शहरातील नागरिक आता ग्रामीण भागात धाव घेऊ लागले आहे.त्यातूनच आता रात्री-अपरात्री विना परवाना येऊन राहत असल्याचे तालुका व पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३३६ ने वाढून ती ३ लाख २१ हजार ९६३ इतकी झाली असून ९ हजार २०४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ०४ हजार ५६८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३ हजार ८३० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २३५ वर जाऊन पोहचली आहे तर ०९ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मध्यन्तरी एक महिला डॉक्टरचा अपवाद ठरवता संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आरोग्य विभागाने हा रुग्ण परिसर पूर्ण बंद केला असताना आता मुंबई पुणे, मनमाड,वैजापूर,येवला आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता या शहरातील नागरिक आता ग्रामीण भागात धाव घेऊ लागले आहे.त्यातूनच आता रात्री-अपरात्री विना परवाना येऊन राहत असल्याचे तालुका व पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

त्यातूनच काल कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी सचिन भगवान उबाळे,भगवान गउजी उबाळे,कल्पना भगवान उबाळे,राखी सचिन उबाळे सर्व रा.बेंद्रे चाळ सहकार नगर मनमाड,ता.नांदगाव,मनोज बद्रीनारायण काबरा, सुजाता मनोज काबरा दोघे रा.मेनरोड येवला,प्रसाद जनार्दन सोनवणे,ऐश्वर्या प्रसाद सोनवणे,दोघे रा.नागडे,ता.येवला,वसंत नाना काळे,आकाश वसंत काळे दोघे रा.यशवंत कॉलनी वैजापूर आदी दहा जणांवर सुमारे तीन गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे,आर.पी.पुंड,आदी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close