कोपरगाव तालुका
अमोल निर्मळ ठरले महाराष्ट्राचे चित्र सम्राट
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांनी छत्रपती युथ फेस्टिवल २६ एप्रिल ते १ मे राज्य पातळीवर महाराष्ट्राचा चित्र सम्राट ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. तिचा निकाल नुकताच जाहीर झाला असून डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर चे कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी या स्पर्धेत राज्यपातळीवरील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले असून महाराष्ट्राचा चित्र सम्राट होण्याचा बहुमान मिळविला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून हजारो कलाकारांनी सहभाग नोंदविला होता या चित्र स्पर्धेत निर्मळ यांनी मुंबईनंतर अहमदनगरला चित्रसम्राट होण्याचा बहुमान मिळवून दिला आहे.या स्पर्धेसाठी त्यांनी खुल्या गटातून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल या विषयांची निवड केली होती
या पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम रुपये ७००१रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून हजारो कलाकारांनी सहभाग नोंदविला होता या चित्र स्पर्धेत निर्मळ यांनी मुंबईनंतर अहमदनगरला चित्रसम्राट होण्याचा बहुमान मिळवून दिला आहे.या स्पर्धेसाठी त्यांनी खुल्या गटातून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल या विषयांची निवड केली होती
निर्मळ यांनी या अगोदरही राज्यपातळीवरील अनेक पारितोषिके मिळविलेली आहे.या यशाबद्दल त्यांच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.