कोपरगाव तालुका
कोपरगावात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्ण ?
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात महिला डॉक्टर कोरोना बाधित सापडल्या नंतर आता गांधीनगर या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयात भरती असलेला व नंतर गौतम बँके शेजारी असलेल्या एका प्रसिद्ध दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी हलविण्यात आलेल्या रुग्णांचा श्राव तपासूनच भरती व शस्रक्रिया करण्याची सावधानता या हॉस्पिटलच्या संचालकांनी दाखवली आहे.व सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना श्राव तपासणीसाठी आग्रह दाखवल्याने शहरातील संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील हा रुग्ण कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या रुग्णाला तातडीने नाशिक येथील रुग्णालयांत हलविण्यात आले असले तरी येथील शहर आरोग्य प्रशासन तणावात आले असून त्यांनी या प्रकरणी तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इसमाची यादी करण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोपरगावातील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी व प्रभारी कोपरगाव आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांचेशी भ्रमंध्वनिवरून संपर्क साधला असता त्या दोघांनीही आपले भ्रमणध्वनी उचलले नाही त्यामुळे या बाबत कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे.व सदरचा रुग्ण हा पाथरे येथील असून त्यास उपचारार्थ तातडीने नाशिक येथे हलविले असल्याची माहिती दिली आहे.व त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने बैठक घेऊन या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर व अन्य व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात रवाना करण्याची तयारी सुरु केली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ५१५ ने वाढून ती २ लाख ७७ हजार ५१४ इतकी झाली असून ७ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ९० हजार ७८७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३ हजार २८९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २१० वर जाऊन पोहचली आहे तर ०९ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण पाच दिवसांपूर्वी महिला डॉक्टरांचा आढळला होता.आता या पाथरे येथील रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने सावधानता बाळगण्यास प्रारंभ केला आहे.