जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात बेशिस्त नोकरास पोलिसांनी बदडले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी जमावबंदी आदेश व आपली दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास केवळ परवानगी दिली असताना कोपरगाव शहरातील निवारा सोसायटीत राज्य पतसंस्था चळवळीच्या जेष्ठ नेत्यांच्या जवळ असलेल्या व्यापाऱ्याचा कर्मचारी नयन बाबासाहेब पवार (वय-२१) रा.खडकी याने सरकारच्या नियमांची माहिती असतानाही त्यांनी मुखपट्टी न लावता आपले दुकान सुरूच ठेवल्याची धक्कादायक माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना समजल्यावरून त्यांनी त्या ठिकाणी थेट आपली हजेरी लावून या नोकरास आपल्या हातातील छडीने चांगलाच चोप दिलाच पण त्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरातील बाकी बेशिस्त व्यापाऱ्यांनीही या घटनेची धास्ती घेतली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करून तालुका प्रशासनाला सहकार्य करावे व कारवाई पासून मुक्त राहाण्याचे आवाहन केले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ५१५ ने वाढून ती २ लाख ७७ हजार ५१४ इतकी झाली असून ७ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ९० हजार ७८७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३ हजार २८९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २१० वर जाऊन पोहचली आहे तर ०९ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता एका महिला डॉक्टर महिला व त्या पाठोपाठ आता पाथरे येथील एक कोरोना रुग्णाने या ठिकाणी खाजगी दवाखाण्यात उपचार घेतल्याची माहिती उघड झाल्याने आता नागरिकांत या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आरोग्य विभागाने संभाजी चौक ते बनकर हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय परिसर या आधीच पूर्ण बंद केला असताना आता हि नवी माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव शहर व तालुका कोरोना मुक्त रहावा या साठी तालुका व शहर प्रशासन मोठी यातायात करीत असून त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यातच कोपरगाव शहर व तालुका व्यापारी महासंघ शिस्तबद्ध व संघटित मानला जात असताना हे गालबोट लागणे नक्कीच भूषणावह नाही.या साठी व्यापारी महासंघाने या बाबत अधिकची सजगता दाखवणे गरजेचे आहे.कोरोनाने जगभर कहर केलेला असून यूरोपीय देशात या साथीला उतार मिळाला असला तरी अद्याप भारतात मात्र कोरोनाचा वाढता आलेख मात्र चिंतादायक आहे.आता सरकारने आता सर्दी-पडसे असले तरी आता रुग्ण थेट नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे रुग्ण सापडण्यास मदत मिळत आहे.या खेरीज खाजगी रुग्णालयांनी या बाबत आता अधिक दक्ष राहण्याची वेळ आली आहे.व नागरिकांनी या व्यवस्थेशी सहकार्य करणे गरजेचे आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.२०४/२०२०भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१,२९० प्रमाणे आरोपी नयन पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close