जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

काळे कारखान्याच्या नूतन प्रकल्पाची चिमणी पडली,जीवित हानी नाही

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखानदारीत अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या शून्य बाह्यद्रव प्रकल्पाच्या नुकत्याच उभारलेल्या चिमणीचा आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मान टाकल्याने खळबळ उडाली आहे.मात्र हा अपघात कामगारांची सुट्टी झाल्यावर व वादळापूर्वी झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.या प्रकरणी शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार हा शून्य बाह्यद्रव प्रकल्प (झिरो लिक्विड आउटलेट प्रोजेक्ट) असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कारखान्याचे व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधला असता ते बाहेर उपचारार्थ दवाखाण्यात असल्याची माहिती दिली आहे.मात्र प्रभारी व्यवस्थापक श्री कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता ते घटनास्थळी उपाययोजना करण्यात गर्क असल्याने त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून यात जीवित हानी झालेली नाही असे स्पष्ट केले आहे.मात्र या प्रकल्पाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कामगार केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले आहे.त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.उशिराने मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प साखर कारखाण्याचा शून्य बाह्यद्रव पदार्थ प्रकल्प (झिरो आउटलेट डिस्चार्ज प्रोजेक्ट)असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात विजेची कमतरता भरून काढण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांमधून अशुद्ध पाणी शुद्ध शून्यावर आणण्याचा व नजीकच्या जमिनीचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रकल्प राबविण्याचे नियोजन राज्य सरकारने आखले होते.सहकारी साखर कारखान्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवण्याचे ठरले. पण प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारी कासवगती आडवी आली.या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत टाकले जाणारे दूषित पाणी(स्पेंट ऑश) थांबविण्यास मदत मिळणार होती. काही कारखान्यांनी याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे.पण अनेक कारखान्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला.तर काही कारखान्यात याचे काम रखडत चालले आहे.शून्य बाह्यद्रव पदार्थ निर्मिती प्रकल्प या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक उत्तर प्रदेशनंतर दुसरा आहे.या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने काही लाख रुपयांपर्यंत अनुदानदेखील जाहीर केले आहे.यात अनेक साखर कारखाण्यानी कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात केली असल्याची माहिती आहे.यात कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर सहकारी साखर कारखान्याने आपले उत्पादन वाढविण्याबरोबरच प्रदूषणाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न निकाली काढण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारणे व प्रदूषण टाळणे यासाठी हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता.त्याचे बरेचशे काम अंतिम टप्य्यात आले आहे.त्यात धुराच्या (नळकांडीचे) चिमणीचे काम अंतिम चरणात आले असताना आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ती अचानक पडल्याने मोठा अनर्थ झाला असला तरी या घटनेत कामगारांची सुट्टी नुकतीच होऊन ते बाहेर पडले असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.मात्र या प्रकल्पाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.हि गंभीर बाब असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close